चेंबूर एम पश्चिम कार्यलावर महाराष्ट्र म्युन्सिपल कामगार युनियन व कचरा वाहतूक श्रमिक संघटनेचा मोर्चा!

मुंबई (जीवन तांबे)किमान वेतन मागितले म्हणून घरी बसविलेल्या कामावर घ्या तसेच कामगाराच्या पैसे हडप करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा या मागणी करिता महाराष्ट्र म्युन्सीपल कामगार युनियन व कचरा वाहतूक श्रमिक संघटनाच्या वतीने एम पश्चिम विभागावर आज मोर्चा काढण्यात आला. 

कोरोना काळात काम करीत असतानाच 70 कामगारांनी किमान वेतन मागितले म्हणून त्यांना गेले नऊ महिन्यापासून घरी बसविले असल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

युनियन व श्रमिक संघटनेचे विजय साळवी यांच्या मार्फत पत्र पत्रव्यहार ही केला परंतु कोणीही दखल घेतली नसल्याने आज या कामगारांनी एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढला.

मागणी मान्य केली नाही तर आमरण उपोषण करण्याचे ठरविले असल्याने कोरोना काळ असल्याने या संघटनांनी मोर्चा व उपोषणाकरिता कोणतीही परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांनी मोर्चा व उपोषण करण्यास नाकारले.

संबंधित पोस्ट