म्हाडा कॉलनीत गणराज्यदिनी कोरोना योद्ध्यांचा सत्कार
- by Reporter
- Jan 27, 2021
- 414 views
मुलुंड:(शेखर भोसले) मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी,साईनाथ चौकात म्हाडा असोसिएशन व नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताकदिनी असोसिएशनचे सचिव पुष्कराज माळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४५ कार्यकर्त्यांचा यावेळी "कोविड योद्धा" प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या कोरोना काळात म्हाडा कॉलनीतील जनतेची अविरत सेवा बजावणारे डॉ.कुशल सावंत, डॉ.कविता येलकर व पालिका अधिकारी भारत बाड, तनुज मोहिते यांचा शाल, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष रवी नाईक, खजिनदार यशवंत बाचीम, नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष किशन काप, सूरज मिठबावकर, अनिल स्यामुआल, कवितके सर उपस्थित होते
रिपोर्टर