
युवा क्रांती सभा व नॕशनल ख्रिश्चन फोरम यांच्या संयुक्त विदयमाने ९ वी संविधान हक्क परिषद संपन्न!
- by Reporter
- Jan 27, 2021
- 747 views
मुंबई (जीवन तांबे) युवा क्रांती सभा व नॕशनल ख्रिश्चन फोरम यांच्या संयुक्त विदयमाने भारतीय संविधानाच्या नागारिक प्रबोधनासाठी 9 वी संविधान हक्क परिषद कुर्ला कोहिनूर पश्चिम येथील फातिमा चर्च मध्ये आयोजित करण्यात आली होती.
संविधानिक मूल्ये भारतीय समाजात रूजविल्या शिवाय देशाचा खरा विकास होणे शक्य नाही असे मत डॉ. हरिभाऊ राठोड यांनी मांडले तर
केंद्रातील भाजपचं सरकार देशाला अधोगतीकडे नेत असून, भारताला महासत्ता करायचं असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाचं पूर्ण आचरण करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रवक्त्या विदयाताई चव्हाण यांनी व्यक्त केलं.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा क्रांती सभेचे अध्यक्ष विशाल हिवाळे, डॉ. विवेक कोरडे, प्रा. मोहम्मद आरिफ, जनार्दन पटेल, स्वप्निल वाडेकर, देवेंद्र यादव, विजय गोरे यांनी आपले विचार मांडले.
यावेळी उपस्थितांना संविधान प्रति वाटप करण्यात आल्या.वॉल्टर डिसोजा.आॕस्कर डिसोजा. मेलविन घोन्सालवीस, सॕवियो कुटिनो, गणेश वारे, ममता मोरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. घेतले.
रिपोर्टर