
कै रोहिदास प्रतिष्ठानतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
- by Reporter
- Jan 27, 2021
- 608 views
मुलुंड: (शेखर भोसले) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ वा वर्धापनदिना निमित्त कै. रोहिदास पाटील प्रतिष्ठानतर्फे मंगळवार दि २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन मुलुंड पूर्व येथील रोहिदास पाटील प्रतिष्ठान कार्यालय येथे करण्यात आले होते. सकाळी ठीक ९-३० वाजता झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (अप्पा) साळवी यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रगीत गावून भारतीय राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. आबालवृद्ध व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी जमा झाले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी जमलेल्या उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे आयोजन कै. रोहिदास पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले होते.
रिपोर्टर