डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष गायकवाड यांची निवड सचिव पदी श्रीराम कांदू

डोंबिवली : डोंबिवली पत्रकार संघाची वार्षिक सभा संपन्न झाली. सन २०२१-२२ साठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार संतोष गायकवाड यांची एकमताने निवड झाली. मावळते अध्यक्ष शंकर जाधव यांच्यासह कार्यकारिणी तसेच सदस्यांनी गायकवाड यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

डोंबिवली पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य कै. विकास काटदरे आणि जेष्ठ सदस्य कै. महेंद्रभाई ठक्कर यांची उणीव संघाला नेहमीच जाणवणार आहे. परंतु त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे डोंबिवलीतील पत्रकारिता आपण सर्वांनी अनुभवली आहे. भविष्यात सांकृतिक डोंबिवली शहराला अपेक्षित असणारी पत्रकारिता डोंबिवली पत्रकार संघातील सदस्यांनी करावी. आजही प्रिंट मिडियामुळेच वाचकांना अपेक्षित बातम्या समजत असतात असे संतोष गायकवाड यांनी सांगितले.

अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी त्यांची कार्यकारिणीही जाहीर केली यामध्ये उपाध्यक्षपदी महावीर बडाला, सचिवपदी श्रीराम कांदू, तर खजिनदारपदी वासुदेवन मेनन यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. सर्व उपस्थित सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. संघातर्फे विविध विषयावर मान्यवरांचे वार्तालाप घेऊन शहरातील पायाभूत सुविधा आणि समस्यांचे निराकारण कसे होईल याकडे लक्ष वेधून घेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट