शिवसेना शाखा क्र १०५ तर्फे ध्वजारोहण सोहळा साजरा

मुलुंड:(शेखर भोसले)भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ वा वर्धापनदिना निमित्त मुलुंड पूर्व येथील शिवसेना शाखा क्र १०५ च्या वतीने मंगळवार दि २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपविभागप्रमुख महेंद्र वैती यांच्या हस्ते  सकाळी ठीक ८-३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (अप्पा) साळवी, इतर मान्यवर आणि महिला व पुरुष शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. मुलुंड नवघर पोलिस ठाण्याचे व.पो.नि. सुनिल कांबळे यांनी देखील यासमयी उपस्थिती लावली.उपस्थितांनी राष्ट्रगीत गावून भारतीय राष्ट्रध्वजास मानवंदना दिली  शिवसेना शाखा क्र.१०५ चे शाखाप्रमुख निलेश मोरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी विशेष मेहनत घेतली. 

संबंधित पोस्ट