शेतकऱ्यांच्या समर्थना करीता ख्रिस्ती बांधवांची विक्रोळीत रॅली!

मुंबई (जीवन तांबे ) दिल्लीत शेतकरी यांनी तीव्र आंदोलन सुरू असल्याने आज प्रजासत्ताक दिनानिमित्त औचित्य विक्रोळी तील ख्रिस्ती समाजाच्या वतीने पूर्वद्रुत मार्गावर भव्य रॅली काढण्यात आली. 

दिल्लीतील मोदी सरकारने शेतकऱ्याच्या विरोधात कायदे बनविल्याने दिल्लीत कित्येक दिवसापासून शेतकऱ्यांनी मोदी विरोधात आंदोलन सुरू केले आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात पडत असल्याने शेतकऱ्यांनी भव्य रॅली काढत आझाद मैदानात धडकले आहेत. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्या-करिता मुंबईतील ख्रिस्ती बांधव समाज उतरला आहे. आज विक्रोळी येथील पूर्वद्रुत मार्गावर ख्रिस्ती समाजाने भव्य रॅली काढून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

गेले एक महीन्या पासून शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यांना विविदग सामाजिक संघटना पाठिंबा देत असल्याने बॉम्बे कॅथलिक सभा ही त्यांना पाठिंबा देण्या-करीता भव्य रॅली काढली आहे. असे स्थानिक समाजसेवक एफ. फर्नांडिस यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट