
कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर
- by Adarsh Maharashtra
- Jan 25, 2021
- 802 views
मुंबई : राज्यस्तरीय "आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच" समूहाच्या प्रमुख व मुख्य प्रशासिका वृषाली सुरेश खाड्ये (मुंबई) यांनी परमपूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त इयत्ता १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कथाकथन स्पर्धा' आयोजित केली होती. कथाकथनचा व्हिडिओ गुगल फाॅर्मद्वारे विद्यार्थ्यांनी आयोजकांना पाठविला. महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. व्हिडिओंच्या परीक्षणानंतर "साहित्यमंच" ह्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आले. विशेष कौतुकाची बाब विराज जितेंद्र वाघ या बालवाडीतील विद्यार्थ्यांनेही आपला सहभाग नोंदवला.
शनिवार दि.२३/०१/२०२१ रोजी ऑनलाईन कार्यक्रमात व्ह्यूज व लाईकसच्या मूल्यांकनावरून निकाल घोषित करून रोख रक्कम व ई-प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले. सहभागी स्पर्धकांनाही ई-प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेचे "सकाळ माध्यम प्रायोजक" होते.
सदर कार्यक्रमाला डॉ. पंकजकुमार शांताराम ननवरे (संचालक राष्ट्रीय सेवा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) हे अध्यक्ष व आरती खैर (प्रशासकीय अधिकारी (शाळा), प्रीती पाटील (विभाग निरीक्षिका (शाळा), भारती रमेश यमगर (मुख्याध्यापिका), नम्रता तुकाराम गोसावी (मुख्याध्यापिका) हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून लाभले.
मा. पंकजकुमार ननवरे सर यांनी या स्पर्धे निमित्त खऱ्या अर्थाने पूज्य साने गुरुजींच्या प्रेमाचा संदेश व संस्काराची शिकवण दिली गेली हे खरोखरच आनंददायी आहे, असे उद्गार काढले. ह्या स्पर्धेनिमित्त साने गुरुजींच्या विचारांचा व गोष्टींचा वसा चालू ठेवत विद्यार्थ्यांना कोरोना महामारीत हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, असे मौलिक विचार मा. आरती खैर यांनी मांडले. नेहमीच शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शैक्षणिक व कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवणारा समूह असे गौरवोद्गार मा. प्रीती पाटील यांनी काढले. मा. भारती यमगर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणा-या समूहाचे मनापासून कौतुक केले. सहभागी व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करत मा. नम्रता गोसावी म्हणाल्या की राज्यस्तरीय विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होतात, त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो हे मंचाचे कार्य अभिमानास्पद आहे.
अनिता विजय चव्हाण (प्रशिक्षित शिक्षिका) प्रतिक्षानगर म.न.पा.उ.प्रा मराठी शाळा क्र.1, सायन कोळीवाडा, मुंबई यांच्या सौजन्याने बक्षिसाची रक्कम देय झाली असून विजयी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
ईशा उमेश इंगवले (प्रबोधनकार ठाकरे मनपा मराठी शाळा शिवडी, मुंबई), आरव प्रविण तावडे (स्कूल ऑफ स्काॅलर्स,अकोला) तन्वी संतोष सावंत (श्री. माधवराव भागवत हायस्कूल विलेपार्ले, मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. साईराज प्रल्हाद हांडे (ज्ञानप्रकाश विद्यालय, मुंबई), मुग्धा राजेश तायडे (स्कूल ऑफ स्काॅलर्स, अकोला), शुभ्रा सुनील रसाळ (सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे) कुशाल विलास अमृतकर (डाॅ. पी. पी. पी. व्हि. स्कूल, जळगाव), काव्या अर्जुन शेट्ये (मनोहर हरीराम चोगुले विद्यालय, गोराई) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
ऑनलाईन बक्षिस वितरण कार्यक्रमात दामोदर चौधरी, ईशा इंगवले, चंचल पाटील, रुद्र शेलार, श्रीवस्ती प्रधान, गौरव चौधरी, प्रथमेश कडुकर, तपस्या पाटील, कुशाल अमृतकर, ओमकार जावळे, उत्कर्ष साबळे, तन्वी सावंत, आरव तावडे, सृष्टी काळे या स्पर्धकांनी स्पर्धेचा आपला अनुभव मनोगतातून व्यक्त केला.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीप मधुकर सोनार (जळगाव), सुनील द्रविड (कोल्हापूर), सुरज राजेंद्र कुदळे (नाशिक), दिलीप यशवंत जाने (जळगाव), वर्षा प्रमोद चोपदार (मुंबई), अंजली अभय ठाकुर (यवतमाळ), गजानन महादेव पुंडे (बुलढाणा), साईली संदेश राणे (मुंबई), सुनिता पांडुरंग अनभुले (मुंबई) यांचे सहकार्य लाभले. साने गुरूजी लिखित 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या गीताने ऑनलाईन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, असे वृषाली खाड्ये यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम