चेंबूर येथील प्रमुख प्रशासकीय कार्यालया मधील उदवाहन कित्येक दिवसापासून बंद!

नागरिक व कर्मचारी त्रस्त!प्रशासकीय अधिकारी व विभागाचे दुर्लक्ष!

मुंबई  (जीवन तांबे)चेंबूर येथील आर.सी मार्गावरील प्रशासकीय ईमारतील दोन्ही विंग मधील उद्वाहन गेल्या अनेक कित्येक महिन्यांपासून बंद आहे.तसेच बंद असल्याने नागरिक व कर्मचारी यांना अटकून रहाण्याची वेळ येत आहे. याकडे प्रशासन अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक व कर्मचारी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय कार्यालये असलेली ४ मजली इमारत आहे. इमारत दोन विंग आहेत. त्यात पोलीस उपायुक्त  परिमंडळ - ६ , सहाय्यक पोलीस आयुक्त  ( चेंबूर विभाग ) , सामाजिक न्याय विभाग,आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ राज्य सफाई कामगार आयोग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण विभाग, ओबीसी महामंडळ विभाग, रजिस्ट्रेशन विभाग आहेत, रेशन कार्यालय आहेत  सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्युत विभाग असलेले तरी या प्रत्येक मजल्यावर दिवस रात्र काळोख असतो.

या सर्व कार्यालयांमध्ये दैनंदिन समस्या व प्रश्न संबंधित विभागात तक्रार व न्याय मिळवण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा    लाभ घेण्यासाठी करिता कित्येक  ज्येष्ठनागरिक, महिला, पुरूष,  तरूण, तरूणी ( विद्यार्थी ), दिव्यांग व्यक्ती सतत ये - जा करीत असतात. प्रशासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांची ही ये - जा करतात यातील अनेक व्यक्तींना ( नागरिकांना )  थकवा,  दमा , अस्थमा,  ब्लड प्रेशर, चक्कर येणे , हार्ट अॅटॅक रोगाने त्रस्त आहेत तर काहींची शस्त्रक्रिया झालेल असतात.

या इमारतीतील चार उदवाहन आहेत त्या चारही उदवाहन मधील काही कित्येक दिवसापासून बंद आहेत. तर काही उदवाहन मध्येच अडकता असल्यांने कित्येक आजारी व्यक्तीला कित्येकांना नाईलाजास्तव जिनाचा आधार घ्यावा लावत आहे. त्यामुळे दुर्घटना ही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

याबाबत काही व्यक्तीनी  पत्रव्यवहार केला परंतु अद्याप कोणत्याही प्रशासकीय अधिकारी व विभागाने दाखल घेतलेली नाही.

 प्रसाकीय अधिकारी यांनी गांभिर्याने लक्ष घालून तात्काळ उद्वाहनं सुरू करून नवीन बटणं लावून सेवा पूर्ववत करावी. तसेच नवीन वर्षात २०२१ मध्ये निधीची तरतूद करून नवीव अद्ययावत ४ उद्वावाहनं तत्काळ लावावीत अशी मागणी ही नागरिकांनी केली आहे.

सदर मागणी तात्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नांगरिकांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट