सामाजिक सक्षमीकरणासाठी ठाणे जिल्ह्यात भीम आर्मी राबवणार स्वाक्षरी मोहीम.

भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक.

मुंबई(प्रतिनिधी) ठाणे जिल्ह्यातील दलित वस्ती सुधार योजनेसाठी असणारा निधी हा इतरत्र वळवण्याचा प्रयत्न सुरू असून हा एकप्रकारे आंबेडकरी समाजाची फसवणूक करण्याचाच डाव असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू असून , ह्याच संदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी भीम आर्मीचे कोकण प्रभारी , ठाणे जिल्हाप्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

उल्हासनगर सारख्या महानगरपालिका मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन करिता सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन सुद्धा , आता ह्या भवनाच्या नावाने फक्त लॉलीपॉप दाखवण्याचेच काम सध्या सुरू असून,हा निधी पुन्हा आंबेडकर भवनाच्या कामासाठी वापरण्यात यावा,तसेच आंबेडकरी वस्तीत असणारे आणि जगभरातील सिंधी समाजाचे पवित्र तीर्थस्थान असणारे भगवान झुलेलाल यांचे प्रार्थनाघर अर्थात झुलेलाल चालिया समोर (मंदिर ) असणारे डम्पिंग ग्राऊंड तिथून ताबडतोब हटविण्यात यावे , तसेच उल्हासनगर महापालिकेतील मुख्य कर अधिकारी दयाराम डोभाळे यांच्यावर जो जातीय अत्याचार करण्यात आला आहे , त्यासंदर्भात अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत लवकरात लवकर कारवाई होऊन दयाराम डोभाळे यांस त्वरित न्याय मिळावा ह्या विविध मागण्यांसाठी भीम आर्मीच्या वतीने लवकरच मोठे जनांदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

ह्या आंदोलनाचा भाग म्हणून संपूर्ण उल्हासनगर शहरात स्वाक्षरी मोहीम राबवून , पंधरा दिवसांत जर निर्णय लागला नाही तर उल्हासनगर महानगरपालिकेला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल अशी माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली असून ह्या बैठकीला उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी , ठाणे जिल्हा सचिव मा.प्रितेश पवार , ज्येष्ठ पत्रकार मा.रामेश्वर गवई ,किसनभाई ओव्हाळ , मा.जीवनभाई सुरडकर , ज्योतीताई सुभाषचंद्र भोसले ,  मा.हरजितसिंह लबाना , मा.नानासाहेब वानखेडे , अनिल महाजन , रमाकांत पाटील सचिन गवई,आकाश गायकवाड अण्णासाहेब कांबळे , अविनाश गरुड , गोपाळ गायकवाड मोहनसिंग लबाना,साधुसिंह लबाना हिरासिंग लबाना,रणजितसिंह लबाना , शोएबभाई मोमीन,नंदुभाऊ काळुंकेआणि श्रावण राठोड उपस्थित होते.

संबंधित पोस्ट