
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
- by Reporter
- Jan 24, 2021
- 867 views
मुलुंड :(शेखर भोसले) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कांजुर येथील शिवसेना शाखा क्र. ११७ चे गटप्रमुख वैभव रघुनाथ मोरे यांच्या वतीने शनिवार दि २३ जानेवारी रोजी विक्रोळी येथील विजय आश्रमात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी नगरसेविका सुवर्णा करंजे, उपविभाग प्रमुख अनंत पाताडे, योगेश पेडणेकर, जयेश मगर, संदिप शिंदे, रमेश कांबळे, तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर