मुंबई कांदिवली मध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
- by Reporter
- Jan 24, 2021
- 366 views
मुंबई(भारत कवितके) मुंबई कांदिवली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन प्रेरणास्थान हिंदू ह्ददयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रविवार दिनांक २४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यत ओमसाई सर्व्हीस सेंटर,सारस्वत बँकेसमोर ,हिंदुस्थान नाका,कांदिवली पश्चिम मुंबई ६७ येथे शिवसेना शाखा क्रमांक २० व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले होते.या रक्तदान शिबीरात एकूण ६० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.या प्रसंगी शिवसेना शाखा प्रमुख अनंत नागम यांनी सर्व रक्तदात्याचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.या प्रसंगी महिला संघटक प्रतिभा शिरकर,कार्यालय प्रमुख स्नेहल सतपाळ,उपशाखा प्रमुख अशोक परब चिकणे,रविंद्र सावंत,प्रतिक सिंग,कुमार सुगावे,आनंदा आमटे,विलास आंब्रे,केवल मांमतोरा,सुरेश साप्ते,विशाल कोकाटे,तुषार पाबळे,आनंदा आमटे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

रिपोर्टर