बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुलुंडमध्ये निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन

मुलुंड :(शेखर भोसले )शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शनिवार दि २३ जानेवारी रोजी विभागप्रमुख, आ. रमेश कोरगांवकर आणि म. विभाग संघटक संध्या वढावकर यांच्या मार्गदर्शना खाली मुलुंडमधील सर्व शिवसेना शाखांनी निरनिराळे कार्यक्रम आयोजित करत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. 

शिवसेना शाखा क्र १०६ च्या वतीने मोफत दंत चिकित्सा शिबिर, मोफत फिजिओथेरपी शिबिर व नेत्रचिकित्सा शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या काळात आयोजित केले होते. डॉ धनश्री घोलप-सावले डॉ आकांक्षा पंडित यांनी फिजिओथेरपी शिबिराला उपस्थित रुग्णांवर उपचार केले तर डॉ राजेश शहा यांनी नेत्रतपासणी केली. डॉ सिद्धेश्वर चमनारु यांनी दंतचिकित्सा शिबिरास उपस्थित रुग्णांच्या दाताशी संबंधित समस्येवर उपचार केले. उपविभाग-प्रमुख महेंद्र वैती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरास शिवसेना शाखा क्र १०६ च्या शिवसैनिकांनी शाखाप्रमुख अमोल संसारे यांना मोलाची साथ दिली. 

शिवसेना शाखा क्र १०५ चे शाखाप्रमुख निलेश मोरे यांनी शिवसैनिकांच्या साथीने व उपविभागप्रमुख महेंद्र वैती यांच्या मार्गदर्शना खाली जिओलाईफ फाऊंडेशनच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ५३ बाटल्या रक्त जमा झाले. 

‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ च्या धर्तीवर शिवसेनेचे पहिले शाखाप्रमुख राहिलेले, गुजराती समाजाचे सनत जोशी यांच्या साथीने गुजराती शिवसैनिक राकेश सोमय्या यांनी मुलुंड पश्चिमेला स्टेशन परिसरात गुजराती समाजाला आपलेसे करण्यासाठी जिलेबी पापडा वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थितांना जिलेबी पापडा वाटण्यात आले. काही गुजराती बांधवांनी विभागप्रमुख आ. रमेश कोरगांवकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र.१०४ येथे प्रतिवर्षाप्रमाणे "स्मृतीस्थळाचे" निर्माण शाखाप्रमुख संजय दळवी आणि शिवसैनिकांनी केले होते. सर्व महीला-पुरुष पदाधिकारी, शिवसैनिकांनी व नागरिकांनी  यांनी स्मृतीस्थळास भेट देवून बाळासाहेबांना अभिवादन करून आदरांजली वाहिली.

संबंधित पोस्ट