-२३ जानेवारी २०१७ आज पुन्हा जाणीव झाली ती गाडगेबाबांच्या अस्तित्वाची

सन १९०५ साली गाडगे महाराजांनी गृहत्याग केला तो ऋणमोचन या पवित्र तिर्थक्षेत्री,त्या ठीकाणीच त्यांनी आपल्या सेवाभावी कार्याची सुरूवात केली. आपला सुखाचा संसार सोडून या अखंड विश्वाला आपल घर मानत हा अवलिया जगाच्या उद्धारासाठी निघाला तो याच ऋणमोचन गावामधून.

पौष महीन्याच्या अखेरच्या रविवारी ऋणमोचन येथे मोठी यात्रा भरत असे,या यात्रेमध्ये लाखो भावीक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असत,ज्यावेळी गाडगे महाराजांनी गृहत्याग केला त्यावेळी त्यांनी पहील पाऊल टाकल ते ऋणमोचन च्या यात्रेमध्ये या ठीकाणी बाबा आल्यानंतर ते विचार करत असतानाच त्यांना कळल की येथील मुदगलेश्वराच्या मंदीरा नजिकच्या नदीच्या काठावर लाखो भाविक हे पाय घसरून पडतात,या गोष्टीकडे बाबांचे लक्ष गेले आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्या ठीकाणी पायरी तयार करण्याचे काम सुरू केले,हा प्रकार पाहून कीत्येक लोक केविलवाण्या दृष्टीकोनातून बाबांकडे पाहू लागले,यावेळी बाबांनी आपल्या अंगावरील चिंध्याच्या कपड्याची झोडी करून वर्गणी जमा करण्याचे ठरवले पाहता पाहता याच वर्गणीतून येथील घाट पुर्ण करण्यात आला.

या कालावधीत बाबांसोबत अनेक लोक जूडत गेले त्यात एक महत्वाच नाव म्हणजे कै.अच्युतरावदादा देशमूख,ज्यांनी बाबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची साथ सोडली नाही.

या घाटाच काम पुर्ण करण्यात दादासाहेबांचीही मोलाची कामगिरी होती,याच काळात दादासाहेबांनी जेव्हा सर्वप्रथम बाबांसोबत काम करण्याचे ठरवले त्यावेळी बाबांनी त्यांना आसपासच्या परीसराच्या स्वच्छतेची जबाबादारी दीली,ती जबाबदारी दादासाहेब अगदी चोखपणे पार पाडत होते,त्याकडे बाबांचेसुध्दा विशेष लक्ष होते.

एक दिवस बाबांनी दादासाहेबांना बोलवून त्यांना एक बंडी आणि धोतर दिल आणि सांगितल की,"दादा आता हेच तुम्हाला आयुष्यभर घालाव लागेल" दादांनी काहीच मागचा पुढचा विचार केला नाही आणि बाबांनी दिलेला शब्द पाळला.

बाबांना हा प्रकार पाहून आधी थोड आश्चर्य वाटल कारण एक धनाड्य व्यक्ती आपल्या म्हणन्यावरून त्याच सगळ सर्वस्व अर्पण करतोय हा प्रकार बाबांनी आयुष्यात पहील्यांदा अनुभवला होता तिथपासूनच बाबांचा दादासाहेबांवरील विश्वास दृढ होत गेला.

बाबांचेे अतिशय विश्वासू म्हणून दादासाहेबांची ओळख होती.बाबांच प्रत्येक काम सांभाळण्याची जबाबदारी बाबांनी दादासाहेबांवर सोपवली.बाबांच्या अखेरच्या काळापर्यंत दादासाहेबांनी बाबांची साथ सोडली नाही.

अखेरच्या काळात दादासाहेबांच्या पत्नी आणि मुल बाबांना अमरावतीच्या सरकारी इस्पितळात भेटायला गेले तेव्हा बाबांनी आपल्या खिशात हात घातला आणि होते नव्हते तेवढे पैसे त्या लहान मुलांच्या हातात दिले,बाबा थोडे रागावलेही होते कारण मुर्तिजापूरहून दादासाहेबांच्या पत्नी आणि मुले बाबांच्या भेटीसाठी आली होती,यावेळी बाबांनी दादांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितल की माझी दशसुत्री आता तुम्हालाच पुढे चालवायची आहे,हे कार्य कधिच बंद पडल नाही पायजे,मी असो वा नसो पण इथल्या गोरगरीब मायबापाले जवाले भेटल पायजे,त्यायले पांगराले कपडे भेटले पायजे,जिवाच रान करा पण या गोरगरीब जनतेची सेवा करा......"

हे शब्द दादासाहेबांच्या मुलाच्या कानात अगदी ठासून भरले,त्यांनी बाबांच्या पायाला स्पर्ष केला,पण तोंडातून काहीच शब्द निघत नव्हते कारण बाबांची तब्बेत खालावत चालली होती,बाबांनी याच क्षणी नागरवाडी जाण्याचा हट्ट दादासाहेबांकडे धरला, यावेळी त्यांच्यासोबत त्यांनी आपल्या विश्वासू सहकार्यांना घेतले आणि नागरवाडीच्या दिशेने निघाले,सोबत असलेली सर्व मंडळी चिंतेत होती कारण बाबांना उपचाराची गरज होती तरीसुद्धा बाबांचा हट्ट हा फक्त नागरवाडीचा होता नागरवाडी हा बाबांचा आत्मा होता,त्यात नागरवाडीच इंद्रभुवन व्हाव हे बाबांच स्वप्न होत.त्यासाठी बाबांनी नागरवाडी मध्ये जाण्याचा आग्रह धरला होता कदाचित बाबांना त्यांचा अंतिम काळ दिसलेला होता आणि आपला देह नागरवाडीसारख्या आनंदवनात ठेवावा हीच त्यांची अखेरची इच्छा होती परंतू चांदूरबाजार नजिक असतानाच बाबांची प्रकृती खुप खालावली,सोबतच्या सहकार्यांनी बाबांना न कळू देता गाडी पुन्हा अमरावती कडे वळवली आणि त्याच वेळी वलगाव नजिक पेढी नदीच्या काठावर बाबांची प्राणज्योत मालवली.

त्यानंतर गाडगे महाराजांच हे सेवेच काम दादासाहेबांनी पुढे चालवल,आपल्या मुलाबाळांनासुद्धा याच सेवाकार्यात त्यांनी सामावून घेतल,कालांतरावे दादासाहेब सुद्धा गेले परंतू गाडगे बाबांचा हा सेवारथ थांबला नाही,हा रथ ओढण्याच काम केल ते बाप्पूसाहेब देशमूख म्हणजेच दादासाहेबांच्या मुलानी.

बाप्पूसाहेबांनी गाडगेबाबांच जनप्रबोधनाच हे सेवाकार्य त्यांच्याच पावलावर पाय ठेवत पुढे चालू ठेवल नागरवाडीच इंद्रभूवन करण्याच स्वप्न दिवसरात्र एक करून,आपल्या आप्तपरीवारापासून दूर राहून पुर्ण केल,पौष महीन्यातल्या अखेरच्या रविवारी होणार्या ऋणमोचनच्या यात्रेतील गोरगरीबांना होणार अन्नदान आणि वस्रदान बाबांच्याच पावलावर पाऊल ठेवत सुरू ठेवल.

यावर्षी सुद्धा बाप्पुसाहेब आपल्या यात्रेच्या कामी लागलेले होते,वर्षभर दारोदार भटकून दमा केलेले वस्त्र गोरगरीबांना वाटण्यासाठी तयार होते दानदात्यांनी अवाढव्य मंडप बांधून दिलेला होता,बाप्पुसाहेब त्या ठीकाणी पोहचलेलेच होते,बाप्पुसाहेबांनी हातात टाळ घेऊन तिथल्या अफाट लोकशक्तीला प्रबोधन करण्यासाठी तयार होत असतानाच बाहेरून कोणीतरी येऊन सांगितल की," बाप्पुसाहेब तुमच्या सासर्यांच निधन झाल,तुम्हाला त्या ठीकाणी जाव लागेल"

बाप्पूसाहेबांनी चौफेर नजर फीरवली सोबतचे सर्व सहकारी सुध्दा थोड अस्वस्थ झाले,परंतू त्यांना बाप्पूसाहेबांचा स्वभाव माहीती होता आणि अगदी तसच घडल बाप्पुसाहेबांनी थोडस स्मित हास्य करत आपल्या सहकार्यांसमवेत "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" चा गजर करत आपल्या जनप्रबोधनाला सुरूवात केली.

यावेळी सर्व उपस्थितांना आठवण झाली ती गाडगेबाबांच्या त्या वाक्याची ज्यावेळी कीर्तन सुरू असताना बाबांना निरोप आला की, "बाबा आपला गोविंदा गेला स्वर्गाला" गोविंदा हा बाबांचा मुलगा असतानाही बाबांनी किर्तन सोडल नाही आणि बोलले की, "ऐसे मेले कोट्यानुकोटी,काय रडू मी एकासाठी ?"

अगदी तेच वाक्य आज बाप्पुसाहेबां सोबतच्या सर्व सहकार्यांना आठवले बाप्पूसाहेबांनी आपल्या नातेवाईक आप्तस्वकीयांचा कुठलाही विचार न करता आपल प्रबोधन सुरू ठेवल ऋणमोचनमध्ये जमा झालेल्या अंधपंगुकुष्ठरोग्यांना हसतमुखाने अन्नदान आणि वस्त्रदान केल परंतू हा कीत्येक वर्षापासून सुरू असलेला सोहळा खंडीत होऊ दिला नाही.

यामुळे येथील उपस्थितांना आज पुन्हा एकदा गाडगेबाबांच्या अस्तित्वाची जाणिव झाली.

अवकाश बोरसे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट