
हरितक्रांतीचे प्रणेते, लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांच्या स्मृतिस्थळाचे उद्घाटनपुतळ्याचे अनावरण - राष्ट्रवादीचे सर्वोसर्व शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते
- by Reporter
- Jan 22, 2021
- 1153 views
सांगली :(आनंद बेंगडे) चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखाना स्थळावर उभारलेल्या हरितक्रांतीचे प्रणेते, लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांच्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन व पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते आज (ता. २२) झाले. त्यांच्या सोबत राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयंतराव पाटील, सहकार व पणन मंत्री मा. बाळासाहेब पाटील, सहकार, कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. विश्वजीत कदम, खासदार मा. श्रीनिवास पाटील, खासदार मा. धैर्यशिल माने, माजी मंत्री मा. अण्णासाहेब डांगे, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार मोहनराव कदम, माजी खासदार मा. राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री मा. शिवाजीराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूणअण्णा लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजीत पाटील व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख यांच्यासह स्वर्गीय फत्तेसिंगअप्पा यांच्यावर प्रेम करणारे शिराळा, वाळवा, शाहूवाडी तालुक्यातील नागरिक, सहकारी, शेतकरी, सर्वसामान्य व मान्यवर उपस्थित होते. कारखाण्याचे अध्यक्ष, शिराळा विधानसभा मतदार संघाचे कर्तृत्ववान आमदार मानसिंगराव नाईक व उपाध्यक्ष, बाबासाहेब पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
रिपोर्टर