रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीं यांना अटक करावी या मागणी करिता काँग्रेस पक्षाचा रिपब्लिक टीव्ही कार्यालयावर मोर्चा!

मुंबई (जीवन तांबे) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीं यांना अटक करण्यात यावी या मागणी करिता राष्ट्रीय  काँग्रेस पक्षाने आज राज्यभर रिपब्लिक टीव्ही कार्यालयावर मोर्चा काढला.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता या दोघांच्या व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः बालाकोट सर्जिकल स्ट्राईक होण्याच्या तीन दिवस आधी याची माहिती अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली ? असा सवालही काँग्रेसकडून विचारला जात आहे. यावर भाजप गप्प का ? असा सवाल काँग्रेसनं केला आहे. दरम्यान या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. काँग्रेसचा मोर्चा रिब्लिकन टीव्ही कार्यालयासमोर नेण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी कमला मिलबाहेर अडवले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्णबविरोधात घोषणाबाजी केली तसेच अर्णबला तात्काळ अटक करण्याची देखील मागणी केली. या आंदोलनामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मंत्री अस्लम शेख,  वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल व काँग्रेस नेते व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट