फडणवीस ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्री; प्रकाश आंबेडकर यांची खरमरीत टीका

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस हे पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्रिपदावर राहणार आहेत. तोपर्यंत त्यांना काय नाटके करायची आहेत ती करू द्यात. पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील,' अशी खरमरीत टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.  मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याचं माहितीच्या आधिकारात उघड झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 'भिडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा आधिकार मुख्यमंत्र्याना नाही. आता त्यांना काय नाटके करायचीत ती करू द्या. पुढच्या वेळी आमचीच सत्ता येणार आहे. पुन्हा भिडेंना आत घालू,' असं आंबेडकर म्हणाले.

काँग्रेससाठी चर्चेची दारं खुली!
आगामी निवडणुकीतील राजकीय आघाडीबाबतही आंबेडकर यांनी यावेळी भूमिका मांडली. 'राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेस पक्षामधील नेते धर्मनिरपेक्ष असल्याने काँग्रेससाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. काँग्रेस नेत्यांचे सतत फोन येत असतात. मात्र, आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही,' असं आंबेडकर म्हणाले. 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा आता मठ-मंदिराना भेटी देणं सुरू केलं आहे. त्यामुळं ते सुद्धा फारसे वेगळे नाहीत,' असं ते म्हणाले. 'वंचित बहुजन आघाडीकडे ३७ लोकसभा मतदारसंघात उमेदवार तयार आहेत,' असंही त्यांनी सांगितलं.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट