
सिरम इन्स्टिट्यूट जळीतकांडाची सीबीआय चौकशी करून,नांदेड जिल्ह्यातील पाच वर्षीय निरागस मुलीवर पाशवी बलात्कार करून हत्या करणाऱ्या वासनांध हैवानाला फाशी द्या.
भीम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केली राज्य शासनाकडे मागणी.
- by Reporter
- Jan 22, 2021
- 409 views
मुंबई(प्रतिनिधी) कोरोना सारख्या महामारीच्या विरोधात संपूर्ण जग लढत असताना , ह्या लढाई विरुद्ध आपला लढा अधिक तीव्र करताना पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कंबर कसली आणि अल्पावधीतच त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून लस शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला.त्याच सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग दुर्दैवी असून , ह्या आगीतून संशयाचा धूर निघत असल्याकारणाने या षडयंत्रामागे कोणी आहे का ? याचा कसून तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी जाहीर मागणी भीम आर्मीच्या वतीने भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आज केली आहे.
ह्या आगीत मृत पावलेल्या निरपराधांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करीत असताना भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी ह्या जळीतकांडाची सीबीआय चौकशी करण्याची जाहीर मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शरमेने मान खाली घालावयास लावणारी लाजिरवाणी नीच घटना नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात असणाऱ्या दिवशी ह्या गावातील मन्नेरवारलू ह्या आदिवासी समाजाच्या आमच्या पाच वर्षांच्या कोवळ्या , निरागस , मासुम अश्या गोजिरवाण्या लेकीवर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नीच हैवानाला ताबडतोब कायदेशीरपणे जाहीर फाशी देण्यात यावी , अशी जाहीर मागणी भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केली आहे.
रिपोर्टर