
बेघर लोकांच्या वास्तव्यामुळे अमर महल जंक्शन विद्रूप
- by Reporter
- Jan 22, 2021
- 735 views
मुंबई(जीवन तांबे)चेंबूर येथील अमरमहल उड्डाण पुलाल खाली जागा बेघर व भिकारीनी व्यापला आहे. हे बेघर व भिकारी पुलाखाली व रस्त्यावर घाण करीत असल्याने नागरिकांना प्रवास करणे मुस्किल झाले आहे चेंबूरच्या अमर महल जंक्शन येथे मागील अनेक महिन्यांपासून विविध ठिकाणाहून आलेल्या बेघर व भिकारी यांनी आपला अड्डाच बनविला आहे.
एससीएलआर उड्डाणपूल, पूर्व द्रुतगती मार्ग उड्डाणपूल व टेंभे पूल या तीनही पुलांखाली मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक व भिकारी यांनी तळ ठोकून बसले आहेत.दिवसभर हिंडून व भीक मागून रात्री डोकं टेकायला या पुलाखाली येतात व पुलाखाली चूल पेटवून त्यावर जेवण बनवितात. स्नान व प्रात:विधी या उड्डाणपुलाखालीच करत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. त्याचप्रमाणे सुशोभिकरण करण्यात आलेल्या लोखंडी ग्रील तसेच कठड्यांवर ही लोकं कपडे वाळत घालत असल्याने हा परिसर संपूर्णतः विद्रूप झालेला आहे. यामुळे सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना येथे साफसफाई करणे अवघड जात आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक जंक्शनच्या ठिकाणी बेघर नागरिकांची संख्या दिवसें दिवस वाढत चालली आहे. ट्राफिक सिग्नल वर उभ्या असणाऱ्या गाड्यांमध्ये हे लोक भीक मागण्याचे काम करतात त्यामुळे ते दिवसभर तेथेच ठाण मांडून बसलेले असतात. मात्र पालिका व एमएमआरडीए प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांमुळे उड्डाणपुलाखाली ची जागा दररोज अस्वच्छ राहते. तसेच कोरोनाच्या काळात या नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने या नागरिकांपासून कोरोनाचा धोका वाढत आहे. चेंबूर येथील या बेघर नागरिकाची याबाबर प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आम्ही ठाणे, नवी मुंबई, मानखुर्द तसेच पुणे परिसरातून या ठिकाणी उदरनिर्वाह भगविण्याकरिता आलो असल्याचे सांगितले. भिक मागून आम्ही पैसे कमवून भूक भागवतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या नागरिकांवर नक्की नियंत्रण कोणाचे आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रिपोर्टर