
दुकाने व आस्थापना ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र सेवेचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन
- by Reporter
- Jan 19, 2021
- 1136 views
मुंबई, दि.१९ : महानगरपलिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यामार्फत दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन अधिनियम २०१७ अंतर्गत निर्गमित करण्यात येणारे नोंदणी प्रमाणपत्र हे ऑनलाईन पद्धतीने, विनाशुल्क, स्थळभेटी शिवाय त्वरित निर्गमित करण्यात येते. सुकर, पारदर्शी तसेच जलद अशा या सेवेचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
व्यवसाय सुलभता धोरण अंतर्गत महा पालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्या मार्फत नोंदणी प्रमाणपत्र हे ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्याची सुविधा कार्यरत आहे. ही सेवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा या ‘टॅब’ वर दुकाने व आस्थापना खाते या सदरामध्ये उपलब्ध आहे.
० ते ९ कर्मचारी कार्यरत असलेल्या आस्थापना मालकांनी प्रपत्र ‘एफ’ आणि १० व त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांच्या मालकांनी प्रपत्र ‘अ’ हे विहित कागदपत्रांसह ऑनलाईन भरावे. ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करताच नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ अर्जदाराच्या ई-मेलवर पाठवले जाते. या सुधारणांमुळे नवीन दुकाने व आस्थापनांना नोंदणी करणे सोईस्कर, पारदर्शी व त्वरित झालेले आहे.
या सेवेचा अधिकाधिक व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रिपोर्टर