कांजुर येथे भजन स्पर्धेचे आयोजन
- by Reporter
- Jan 19, 2021
- 800 views
मुलुंड:(शेखर भोसले)कै.भरत मारु साळुंके यांच्या स्मरणार्थ कांजूर विभागातील सहयोग भजन मंडळ यांच्यातर्फे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर भजन स्पर्धेत अनेक नामवंत भजनी बुवांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे आयोजक भजनसम्राट भगवान लोकरे यांचा सत्कार मंडळाचे मार्गदर्शक बाबा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सराफ, आण्णा मुळे पाटील, सुरेश उभारे, विवेक नागले, विवेक पाटणकर, सुमेध सकपाळ इ. कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून भजनांचा आस्वाद घेतला.

रिपोर्टर