गोवंडी येथील नीलकंठ इमारती मधील एचडीएफसी बँकेतील अनधिकृत बांधकामावर पालिका एम पूर्वची धडक कारवाई!
- by Reporter
- Jan 19, 2021
- 1214 views
मुंबई (जीवन तांबे) गोवंडी येथील नीलकंठ इमारत मधील एचडीएफसी बँकेतील अनधिकृत बांधकामावर पालिका एम पूर्व कार्यालयाने धडक कारवाई करून बांधकाम पाडून टाकले गोवंडी येथील गोवंडी गांव मार्गावरील नीलकंठ इमारतीतील दुकान क्रमांक १० व ११ समीर राम सिघानी यांच्या मालकीचे आहे. त्यांनी ही दोन दुकाने एचडीएफसी बँकेला भाडे तत्ववार दिली होती. या मालकाने पालिकेची कोणतीही अंतर्गत बांधकामा करिता परवानगी न घेता अनधिकृतपणे तळघर मजला एकत्रिकरण करून केबिन बनविले. एक जिना आणि एक लॉकर रूम आणि शॉप क्रमांक १० आणि ११ (२) तळ मजल्याची भिंत एकत्रित केले.केबिनच जवळ एक जिना व शौचालय बांधले या अनधिकृत बांधकामा बाबत समाज सेवक अजय बटीजा यांनी पालिका एम पूर्व इमारत विभागाला पत्र व्यवहार करून निदर्शनास आणून दिले. पालिका एम पूर्व इमारत विभागाने या मालकाला अनधिकृत पणे बांधकाम केल्याने एमआरटीपी कायद्यानुसार नोटीस ५३ (१) ३ नोटीस दिली. परंतु त्याने कोणते ही उत्तर दिले नसल्याने गेले कित्येक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पालिकेचे सहायक अभियंता यांनी मालकाला एमआरटीपी कायद्यानुसार नोटीस ५३ (१) ३ आज पालिका सहाय्यक अभियंता यांनी एचडीएफसी बँकेतील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करून बांधकाम पाडून टाकले.
रिपोर्टर