खा. मनोज कोटक हयांच्या मागणी नुसार तांडव मालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती व प्रसारण मंत्रालयाचे समन्स.

मुलुंड:(शेखर भोसले) ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक ह्यांनी हिंदू देवी देवतांचे विडंबन करणाऱ्या "तांडव" ह्या मालिकेत हिंदू देवी देवतांचे विडंबन  या असल्याने या मालिकेवर बंदी आणावी अशी मागणी करणारे एक पत्र माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांना लिहिले असून त्यात त्यांनी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी फ्लट्फॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या "तांडव" या मालिकेविरोधात तक्रार केली असून विवाद उत्पन्न करणाऱ्या, वादग्रस्त, अश्श्चील मालिका निर्माण करण्याचे सध्या पेव सुटले असून करू नये भविष्यात कोणीही अशा प्रकारच्या मालिका निर्माण करत असतील तर त्या निर्माण करण्यावर बंदी आणावी तसेच कोणत्याही ओटीटी फ्लट्फॉर्मवर अश्या मालिका दाखवण्यात येवू नये, अशी मागणी मनोज कोटक यांनी पत्राद्वारे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. 

खासदार मनोज कोटक यांनी केलेल्या मागणीवर त्यावर तात्काळ कारवाई करत सैफ अली खान, डिंपल कापडिया यांचा अभिनय असलेल्या वेब सीरिज तांडवच्या संदर्भात माहिती व प्रसारण मंत्रालयाने भारतातील अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ अधिकऱ्यांना  चोकशीसाठी बोलावले असून त्यांच्या चौकशीअंती या मालिकेवर कारवाई करण्याचा विचार असल्याचे समजले.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट