त्यागी-समर्पित कार्यकर्त्यांच्या घामाचा आंबेडकरी आंदोलनाचा विजय. भीम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांची प्रतिक्रिया.

मुंबई(प्रतिनिधी) महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे काल निकाल जाहीर झाले असून ,ह्यात  भीम आर्मी आणि आझाद समाज पक्ष पुरस्कृत उमेदवारांनी प्रस्थापितांना लोळवत मिळवलेला विजय , हा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या सच्चा निष्ठावंत लढाऊ कार्यकर्त्यांचा विजय असून , त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा सन्मान असून , कार्यकर्त्यांना लढण्याची उमेद आणि जिंकण्याची ऊर्जा देणारा आहे. आम्ही ह्या विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत , अश्या शब्दांत भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य नेते भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवून आपला आनंद व्यक्त केला.

भिमपँथर मा.राजेश गवळी ह्यांनी ह्या ऐतिहासिक विजयाचे संपूर्ण श्रेय भीम आर्मीच्या त्यागी कार्यकर्त्यांना देताना सांगितले की , आजचा हा मिळवलेला विजय हा साधासुधा विजय नसून तो सर्वार्थाने अतिशय महत्वपूर्ण असा गौरवास्पद विजय आहे. कोणत्याही प्रकारची साधनसामग्री नसताना , गाठीशी पुरेसा अनुभव नसताना ,  निवडणूक लढण्याची स्वतंत्र अशी यंत्रणा नसताना , केवळ त्यागी-समर्पित कार्यकर्त्यांच्या घामावर लढवली गेलेली ही निवडणूक होती. प्रस्थापित धनदांडग्यांना , फकिरांनी  दिलेली ती यशस्वी टक्कर होती. हेच ह्या निवडणुकीचे मोठे वैशिष्ट्ये होते. भीम आर्मी संस्थापक संविधान रक्षक क्रांतीनायक भाई चंद्रशेखर आझाद यांनी पाहिलेल्या सत्ता सोपानाची ही पहिली मजबूत पायरी म्हणूनच आजच्या विजयाची नोंद आंबेडकरी आंदोलनाच्या दैदीप्यमान इतिहासात अवश्य घेतल्या जाईल.

नागपूर पासून ते अमरावती , पुण्यापासून ते ठाणे-रायगड आणि सोलापूर पासून ते औरंगाबाद पर्यंत भीम आर्मी आणि आझाद समाज पक्षाच्या ताकदीवर तसेच स्वकर्तृत्वावर , स्वकार्यावर निवडून आलेल्या सर्वच भीमसैनिकांचे आम्ही पुनश्च स्वागत करीत असून , त्यांच्या उज्वल राजकीय-सामाजिक कारकिर्दीला मनःपूर्वक मंगल शुभेच्छा देत आहोत असेही भिमपँथर मा.राजेश गवळी ह्यांनी सांगितले.

भीम आर्मीचे राज्याचे माजी मुख्य महासचिव मा.मनिषभाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका अध्यक्ष  संजयभाऊ घरडे यांचे पूर्ण पॅनल निवडून आले आणि आणि संजय भाऊ स्वतः सरपंचा साठी १०० % दावेदार आहेत.तसेच रायगडच्या कर्जत तालुक्यातील एक पूर्ण पॅनल विजयी झाले असून तेथील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचा हा विजय असून , भीम आर्मीच्या कर्जत तालुकाप्रमुख मा.नम्रताताई ताम्हाणे यांचे योगदान महत्वाचे असल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी नमूद करून जळगाव जिल्ह्यात राज्याचे माजी प्रवक्ते मा.रमाकांत तायडे आणि जिल्हाप्रमुख मा.गणेशभाई सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ तालुकाप्रमुख विजय मालवीय यांच्यासह संपूर्ण पॅनल विजयी झाले असून कोल्हापूर मध्ये सुद्धा राज्याचे माजी उपाध्यक्ष रमेशचंद्र बालेश यांचे पुतणे  प्रशांत बालेश हे निवडून आले आहेत.राज्य माजी महासचिव सिताराम गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात भीम आर्मी पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत , नागपूर जिल्हाप्रमुख मा.प्रफुल्लजी शेंडे यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीने मोठे यश संपादन केले आहे.

ह्या सर्व विजयी उमेदवारांचे भीम आर्मीचे राज्यप्रभारी मा.दत्तूभाई मेढे , केंद्रीय सदस्य अशोकभाऊ कांबळे आणि कोअर कमिटीचे राजू झनके यांनी अभिनंदन केल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट