कोरोनाला हरविणाऱ्या धारावीकारांचा पुन्हा एकदा मुंबईकरांना मदतीचा हात,एकाच दिवसात सुमारे एक हजार नागरिकांनी केले रक्तदान

मुंबई (जीवन तांबे) स्वयंशिस्त, सरकारी नियमांचे पालन आणि सरकारी यंत्रणांनी बजावलेली चोख कामगिरी यामुळे कोरोनाच्या संकटाला हद्दपार करणारे धारावीकर पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांच्या मदतीला धावून आले आहेत. 'राज्यातील रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी रक्तदान करा, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत काल ता. १७ रविवारच्या एकाच दिवसात सुमारे १००० धारवीकरांनी रक्तदान केले. माननीय मुख्यमंत्र्यांचे आवाहन आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे (२३ जानेवारी) औचित्य साधून धरावी विधानसभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या 'भव्य रक्तदान शिबिरा'ला उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी धारावीकरांचे आभार मानले.

कोरोना संकटामुळे राज्यभरातील रक्तदान कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी (१७ जानेवारी) धारावीत विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात एकूण ९८९ दात्यांनी रक्तदान केले. खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार-विभागप्रमुख सदा सरवणकर, माजी महापौर श्रद्धाताई जाधव, आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, उपाध्यक्ष वसंत नकाशे, नगरसेविका हर्षालाताई मोरे यांसह अन्य मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

राहुल शेवाळे ( खासदार )

ज्या धारावीमुळे संपूर्ण मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होईल, अशी भीती यंत्रणेला आणि मुंबईकरांना वाटत होती, त्या धारावीच्या जनतेने आज पुन्हा एकदा आपलं मोठेपण सिद्ध केलंय. धारावीतील कोरोनावर पूर्णतः ताबा मिळाल्यावर राज्यातील पहिले 'प्लाझ्मा दान शिबीर' आयोजित करून धारवीकारांनी मुंबईच्या जनतेला मदतीचा हात दिला होता. आज पुन्हा एकदा, एकाच दिवसांत १००० धारावीकर दात्यांनी रक्तदान करून मोठं पाऊल उचललं आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे शिबीर आयोजित करून पदाधिकऱ्यांनी शिवसेनाप्रमुखांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे. 

संबंधित पोस्ट