विक्रोळी येथे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीनेइंधन दरवाढी विरोधात आंदोलन

अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सिराज अहमद यांनी केले आंदोलनाचे आयोजन

मुंबई:विक्रोळी पार्कसाईट, घाटकोपर पश्चिम येथे आज इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या आदेशावरून आणि अल्पसंख्याक सेलचे ईशान्य मुंबई अध्यक्ष  सिराज अहमद यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात आला.  सुमारे १८.९ दशलक्ष नोकरदारांनी देशात आपली नोकरी गमावली आहे.

अशा परिस्थितीत इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. २०१५-१६ मधे आंतरराष्ट्रीय बाजारात  कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होऊन सुद्धा केंद्र सरकारने इंधनावरील कर वाढवून पेट्रोल डिझेल चे भाव कमी केले नाहीत. २०१७ पासून आंतरराष्ट्रीय बाजारात  कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असताना मात्र केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल चे भाव वाढवले. २०२१ मध्ये पेट्रोल, डिझेल च्या भावाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. डिसेंबर २०२० मध्ये भारतीयांनी पेट्रोल वर खर्च केलेल्या १०० रुपयांवर ६३ रूपये  टॅक्स म्हणून खर्च केले आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने तात्काळ इंधन दरवाढ रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

या मोर्चात राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जेष्ठ नेते श्री शिवाजीराव नालावडे, तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव, विद्यार्थी सेलचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले, पदवीधर चे तालुका अध्यक्ष अजित सकटे तसेच फ्रंटल आणि सेलचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट