सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत मानील अभिहस्तांतरण विशेष मोहीम

मुंबई(प्रतिनिधी)सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance) विशेष मोहिम संदर्भात विनामूल्य मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन *मा. श्री. विलासजी पोतनीस, आमदार आणि  मा. श्री. प्रकाशजी सुर्वे, आमदार यांच्या हस्ते संपन्न झाला

ॲड. श्री. अजित मांजरेकर,ॲड. श्री. निलेश परमार, ॲड. श्री. दिनेश मलेकर, ॲड. श्री अवधूत सावंत, ॲड. श्री. अमर शेलार, ॲड. श्री. रोशन चव्हाण आणि निष्णात आर्किटेक् श्री. मंगेश नवले यांनी मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance) या विषयावर तपशीलवार माहिती देऊन सर्वांच्या शंकांचे योग्य ते निरसन केले. 

असोसिएशन तर्फे सदर मोहीम यशस्वी होण्याच्या अनुषंगाने सर्व पात्र गृहनिर्माण संस्थांनी आवश्यक प्रस्ताव सादर करून मुदतीत अर्ज निकाली काढण्यासाठी या विशेष मोहिमेद्वारे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. 

कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी प्रकाश पुजारी शाखाप्रमुख, युवासेना विधानसभा समन्वयक ऋषी बाळकृष्ण ब्रीद कार्यालय-प्रमुख वसंत पाटील उपशाखाप्रमुख गुलाब हेमाडे,संतोष नाईक,सुधाकर सावंत,भिमराव नलावडे,महिला उपशाखासंघटक साजिदा शेख, हेमा मयेकर, संचिता गोपाळ, सविता नेहरे शिवसैनिक दत्ताराम चिंदरकर,अजित जाधव,उद्देश खणजोरे,योगेश परब,अजय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताराम घुगे दादाभाऊ पानमंद यांनी केले. 

या मार्गदर्शनपर शिबिरासाठी आपल्या वॉर्डमधील संस्थांच्या सभासदांचा लाभलेला उस्फूर्त प्रतिसाद पहाता उपस्थित मान्यवर आणि संस्थांचे सभासद, तसेच सर्व पदाधिकारी यांचे आभार मानून नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी कृतज्ञता व्यक्त  केली.

संबंधित पोस्ट