नावे बदलून काय करणार?

मुंबई(प्रतिनिधी) - शहरांची नावे बदलून काय साद्य होणार?पूर्वपरंपरेने जी नावे अस्तित्वात आहेत ती काही केल्या पुसली जाणार नाहीत केवळ राजकीय पोळी भाजण्याकरता आणि काही मूठभर भक्तांची माथी भडकवण्याकरता नावे बदलण्याचा अट्टाहास कशाला?थोर राष्ट्रपुरुषांची नावे शहराला दिल्यानंतर ते शहर सुजलाम्-सुफलाम् होणार काय?राष्ट्रपुरुषांचे विचार खरचं आचरणात आणले जाणार काय?तेथे खरचं "शिवशाही" अवतरणार काय?असे मत जेष्ठ समाजसेवक दीपक शिरवडकर यानी व्यक्त केले.

महाराष्ट्राची भूमी थोर संतांची महापुरुषांची आहे येथे समाजा-समाजात एकोपा रहावा अशी शिकवण आहे केवळ काही राजकारणी विनाकारण एकोप्याने नांदणाऱ्या समाजा-समाजात तेढ निर्माण करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत पुरोगामी महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवत आहेत?अशा वेदना दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केल्या.

आज सर्वसामान्यांच्या ज्या वेदना आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत रोटी-कपडा-रोजगार-उत्तम आरोग्य सुविधा-मोफत शिक्षण-नागरी सुविधा मिळणे गरजेचे आहे. नावे बदलल्याने त्या साऱ्या गोष्टी सर्वसामान्यांच्या पदरात पडणार आहेत काय?सरकारी पैशाने दौरे करणारे,सुरक्षा घेणारे,सुखसोयी लाटणारे याचा विचार करणार काय?सामान्यजणही अशा राजकारण्यांच्या भूलथापांना आणखी किती दिवस बळी पडणार?असे सडेतोड मत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.


                         

संबंधित पोस्ट