भास्कर विचारे यांची राष्ट्रवादीच्या युवक, विद्यार्थी, पदवीधर सेल निरीक्षक पदी निवड

मुलुंड:(शेखर भोसले)राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, भांडूपकर भास्कर विचारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक, विद्यार्थी, पदवीधर सेलच्या निरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच जगन्नाथ बँक्वेंट हॉल, भांडुप येथे नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भास्कर विचारे यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व ई.मुं.जिल्हा निरीक्षक विलास माने, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ व मुंबई विभागीय इतर पदाधिकारी उपस्थित होते. 


पक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रम राबविताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देवून मुंबईतील धर्म निरपेक्ष व्यक्तींचा पक्षात समावेश करून पुरोगामी विचारधारांच्या माध्यमातून संघटन मजबुतीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बांधण्यासाठी, पक्षाच्या वाढीसाठी मेहनत घेणार असल्याचे भास्कर विचारे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट