कचरा व्यवस्थापनाबद्दल पालिकेतर्फे जनजागृती करणार

मुलुंड:(शेखर भोसले)मुलुंड पूर्वेतील उमिया टॉवरच्या समोर, पत्रा चाळ परिसरात नेहमीच रस्त्यावर कचरा पडलेला असतो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी व रोगराई पसरलेली असते. स्थानिक नागरिकांतर्फे त्यासंबंधी सातत्याने तक्रार करण्यात येत होत्या परंतु काहीच कारवाई होत नव्हती. संबधित पालिका अधिकाऱ्यांच्या हे नजरेत आणून देण्यात आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या सफाई कर्मचाऱ्यां मार्फत परिसर साफ करून . तसेच यापुढे तेथे रस्त्यावर कोणीही कचरा टाकू नये यासाठी पुढील काही दिवस तेथे मार्शल ठेवण्याचे पालिका अधिकारी महेंद्र पाटील यांनी आश्वासन दिले आहे. 


नवघर पहिल्या गल्लीतील मासळी बाजारा जवळ तसेच नवघर दुसऱ्या गल्लीजवळ नेहमीच मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने सदर परिसरात देखील अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे हा परिसर देखील नेहमीच स्वच्छ ठेवण्यात येईल व कचऱ्यासंबंधी परिसरात जन जागृती केली जाईल असे घ.क.व्य.चे पालिका अधिकारी महेंद्र पाटील यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट