शिवसेनेला धक्का : आमदार प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जागा ईडीने घेतली ताब्यात

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची गुरुवली येथील ७८ एकर जमीन ईडीने ताब्यात घेतली आहे. गुरवली येथील ११२ सातबारा असलेली ७४.२७ एकर जमिनीवर ईडीने कारवाई करत ताबा घेतला आहे. मंडल अधिकारी यांनी जागेवर जाऊन नोटीस लावली असून माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज या जागेवर जाऊन पाहणी केली असता  लवकर नोटीस काढल्याचे समजले.

आमदार प्रताप सरनाईक व मोहीत अग्रवाल यांनी एन एस ई एल, कंपनी साठी दोनशे कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्यातील १०० कोटी रुपये कल्याण तालुक्यातील गुरुवली येथील ७८ एकर जागा खरेदीत गुंतवले, याबाबत कंपनीच्या नावाने कोटी रुपये फसवणूक केली आल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर  याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी तकार दाखल केली होती. ईडीने संपूर्ण  प्रकाराची चौकशी केली व अखेर १०० कोटी रुपये भरण्यासाठी  सांगितले होते. ते न भरल्याने गुरुवली येथील ७८ एकर जमीन ताब्यात घेत त्याबाबत नोटीस लावली आहे.

तर यावेळी ठाकरे सरकारचे एकामागून एक घोटाळे बाहेर पडत असल्याने घाबरलेल्या ठाकरे सरकारने  विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट