
चेंबूर परिसरात कावळ्याचा होतोय मृत्यूl नागरिक भयभीतl
- by Reporter
- Jan 10, 2021
- 908 views
मुंबई :(जीवन तांबे) चेंबूर येथील टाटांनगर वसाहतीत कावळे व इतर पक्षी मरून पडत असल्याचे घटना घडत असल्याने परिसरातील नागरिकांना हे पक्षी का मरतात असा प्रश्न पडला आहे.
चेंबूर येथील वाशीनाका परिसरात विविध रासायनिक कंपन्या आहेत. या कंपनीमधून धूर , वायू बाहेर पडत असल्याने चेंबूर परिसरात प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. याचे फार वाईट परिणाम नागरिकांच्या स्वास्थ्यावर होताना दिसत आहे.
सध्या वाढते प्रदूषण, वातावरण बदल व कोरोना सारख्या महामारीच्या काळात विविध विषाणूचा धोका निर्माण झाला आहे.याचा परिणाम नागरिकाप्रमाणे पक्षांवर होताना दिसत आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून चेंबूर, वाशीनाका, आरसीएफ परिसरात मोठ्या प्रमाणात कावळे व विविध पक्षी मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांच्या आजारात वाढ होते. देशात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुरू असताना पक्षी मरणाच्या घटना सुध्दा चेंबूर परिसरात घडत आहे. आज टाटा वसाहतीत आज एकूण 9 पेक्षा अधिक कावळे मेलेले आढळले आहे.
पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यूचे कारण काय आहे अद्याप कोणालाही कळलेले नसले तरी या पक्षाचा मृत्यू बर्डफ्लू, एच5एच1मुळे होत असल्याने नागरिक ही भयभीत झाले आहेत.
प्रतिक्रिया -
सहा. आयुक्त ( पशु तज्ञ )राजेश चातुर
कावळे व पक्षी का मरतात त्याचे नमुने घेऊन लॅब मध्ये चाचणी करिता पाठविले आहे. रिपोर्ट आल्यास याबाबत माहीती मिळेल.
मिलिंद तळेकर ( रहिवासी )
कावळे गेल्या नोव्हेम्बर महिन्या पासून मरताना दिसत आहेत.मला आता पर्यंत मेलेले कावळे पाच सहा आढळून आले आहे.पालिकेने खबर दारीची उपाय योजना करावी व या पक्षाचा जीव वाचविण्याचा प्रयन्त करावा.
रिपोर्टर