ओमकार बिल्डरच्या ५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुरेंद्र सुराणा यांची तक्रार
- by Adarsh Maharashtra
- Jan 10, 2021
- 1506 views
मुंबई :ओमकार बिल्डरच्या वतीने झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत तसेच अन्य व्यवहारा मध्ये यस बँकेच्या मदतीने ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असून याप्रकरणी त्वरित योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुंबईतील उद्योजक सुरेंद्रकुमार सुराणा यांनी केली आहे.
त्याच्या प्रती त्यांनी गृह मत्रालय, वित्त मंत्रालय, ईडी, सीबीआय तसेच विविध शासकीय विभागांना दिल्या आहेत. याबाबत गेली ३ वर्षे आपण तक्रारी करत असून त्याचा पाठपुरावा देखील करत आहोत.मात्र योग्य दखल घेतली जात नसल्यामुळे अखेर आपल्याकडे दाद मागावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून या ५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करून त्वरित संबंधित दोषीेना शासन करावे, अशी मागणीही केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम