मुलुंड विधानसभेत रुग्णांना फळ वाटप करून ममता दिन साजरा

मुलुंड:(शेखर भोसले)शिवसेना मुलुंड विधानसभेच्या वतीने विभागप्रमुख रमेश कोरगांवकर व महिला विभाग संघटिका संध्या वढावकर यांच्या मार्गदर्शना खाली बुधवार दि.६ जानेवारी २०२१ रोजी मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त 'ममता दिन' साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मुलुंड मधील अग्रवाल रुग्णालय, श्रीमती श्यामकुवंरबाई जटाशंकर डोसा प्रसूतीगृह आणि स्वातंत्रवीर सावरकर रुग्णालय या तीन महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एस अँड टी प्रभाग समितीच्या अध्यक्षा दिपमाला बढे, यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपविभाग प्रमुख महेंद्र वैती, सुनील गारे, म. उपविभाग संघटिका शितल पालांडे, विधानसभा संघटक नितिन सावंत, विधानसभा कार्यालयप्रमुख सिताराम खांडेकर व इतर शाखाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी आणि महिला व पुरुष शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागप्रमुख दिनेश जाधव यांनी केले होते.

संबंधित पोस्ट