श्रीलंकेची संसद बरखास्त करण्याचे राष्ट्रपतींने दिले आदेश ; ५ जानेवारी रोजी संसदीय निवडणुकींची घोषणा
- by Adarsh Maharashtra
- Nov 10, 2018
- 763 views
कोलंबो - श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी शुक्रवारी रात्री देशाची संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या शेजारील श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्षांनी संसद बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली. द युनायटेड नॅशनल पार्टी ऑफ श्रीलंका या पक्षाने या निर्णयाचा विरोध केला आहे.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी संसद बरखास्त करण्याचे आदेश काढले आहेत. यासोबतच 5 जानेवारी रोजी संसदीय निवडणुकींची घोषणा त्यांनी केली आहे. पंतप्रधान महिंदा राजपाक्षे यांच्याकडे संसदेत बहुमत नव्हते हे यावरून स्पष्ट झाले आहे. 26 ऑक्टोबरपासून श्रीलंकेच्या राजकारणात नाटकीय घटनाक्रमाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी पंतप्रधान रानिल विक्रमेसिंघे यांना पदावरून काढून त्यांच्या जागी माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांना पंतप्रधान केले. तेव्हापासूनच श्रीलंकेत राजकीय वातावरण चिघळले होते.
सिरीसेना यांनी संसद बरखास्त करण्यासाठी काढलेल्या आदेशावर शुक्रवारी मध्यरात्री स्वाक्षरी केली. त्यानुसार, 19 ते 26 नोव्हेंबर दरम्यान निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 5 जानेवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान होईल. आणि 17 जानेवारी पर्यंत नवीन संसदेची स्थापना केली जाणार आहे. राजपाक्षे यांना पंतप्रधान केल्यानंतरही बहुमत मिळवणे शक्य नव्हते. त्यामुळे, कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या 21 महिन्यांपूर्वीच राष्ट्राध्यक्षांनी निवडणुकीची घोषणा केली. अन्यथा ऑगस्ट 2020 पर्यंत सरकारचा कार्यकाळ संपला नसता.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम