दिल्लीच्या तख्तावर निळा झेंडा फडकविण्याची संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद यांची चेंबूरच्या म.फुले नगरातील रेकॉर्डब्रेक सभेत भीमप्रतिज्ञा.
भिमपँथर मा.राजेश गवळी आणि संतोष गायकवाड यांचा भाईने केला खास गौरव
- by Reporter
- Jan 04, 2021
- 1119 views
मुंबई (प्रतिनिधी) मुंगीला शिरायला सुद्धा वाव नसणारी , अक्षरशः चेंगराचेंगरी होण्याची भीती उत्पन्न झालेली , जिथे नजर फिरवाल तिथे फक्त जनसागर दिसून येईल अशी महाराष्ट्रातील सर्व चौकसभांच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढणारी अतिविराट अभूतपूर्व ऐतिहासिक सभा भीम आर्मीच्या स्थानिक शाखेच्या वतीने मुंबईतील चेंबूरच्या पी.एल.लोखंडे मार्गावरील म.फुले नगर क्र.१ येथील धम्मचक्रवर्ती बुद्ध विहारासमोरील भव्य मैदानात पार पडली.ह्या अतिविशाल सभेला संबोधित करण्यासाठी भीम आर्मीचे संस्थापक प्रमुख आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक क्रांतीनायक भाई चंद्रशेखर आझाद हे स्वतः उपस्थित राहिल्याचे भीम आर्मीचे राज्य नेते भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले ह्या ऐतिहासिक सभेला संबोधित करण्या आधी भाई चंद्रशेखर आझाद ह्यांना स्थानिक महिलांनी निळ लावून ,त्यांच्यावर पुष्प-फुलांचा वर्षाव करीत त्यांचे औक्षण केले ह्यानंतर हजारो जनतेच्या सोबत भाई धम्मचक्रवर्ती बुद्ध विहारात गेले.तिथे त्यांनी तथागत बुद्ध व बाबासाहेबांच्या पंचधातूंच्या मूर्तीसमोर मेणबत्ती-अगरबत्ती पेटवून माल्यार्पण करून विनम्रभावे अभिवादन केले.
त्यानंतर भाई चंद्रशेखर आझाद भाषण करतील अशी घोषणा भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी करताच संपूर्ण मैदानात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.भाई चंद्रशेखर आझाद यांनी त्या अतिविराट जनसागराला संबोधित करताना जातीयवादी-धर्मांधवादी-नफरतखोर-विषमतावादी शक्तींवर जोरदार आसूड ओढले.मुंबईतील झोपडपट्टीत रहाणाऱ्या रहिवाश्यांवर एसआरए योजनेंतर्गत बिल्डरलॉबी अन्याय अत्याचार करत असेल तर ते कधीही खपवून घेणार नसल्याचे सांगून बिल्डरलॉबीला सुद्धा सूचक इशारा दिला.तरुणांनी शिक्षणावर भर देऊन आपली स्वतःची , आपल्या परिवाराची आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचे प्रतिपादन ही भाईने केले,असे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले आहे.
भाई चंद्रशेखर आझाद यांनी ह्या देशातील मानवताविरोधी शक्तींना नष्ट करून ह्या देशातील संसदेवर निळा झेंडा उभारून ह्या देशातील तख्तावर आंबेडकरवादी भीमसैनिक बसवण्याची ह्या महात्मा फुले नगरात मी भीमप्रतिज्ञा करीत आहे ,आणि माझी ही भीमप्रतिज्ञा पूर्ण करून मी पुन्हा एकदा ह्या महात्मा फुले नगरच्या क्रांतिभूमीत येईल ,असे जाहीर वचन त्यांनी तेथील हजारो लोकांना दिल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.
न भूतो न भविष्यती अशी झालेल्या ह्या जाहीर सभेत महिलांची संख्या प्रचंड लक्षणीय होती , तरुणांबरोबर वयस्क व्यक्तींचा उत्साह ओसंडून वाहत होता , त्यांनी आपल्या आंबेडकरी समाजाच्या बंडखोर महानायकाला "याची देही याची डोळा" पाहिल्याने ते स्वतःला कृत कृत मानत होते.ह्या सभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे भाईंना भेटण्यासाठी, त्यांना मंगल कामना देण्यासाठी अगदी १०० वर्षापुढील जराजर्जर मंडळी सुद्धा घराच्या बाहेर येऊन थांबली होती.भाईंची क्रेझ इतकी प्रचंड की शब्दशः लहान लहान ५-१० वर्षाची मुले सुद्धा चंद्रशेखर आझाद झिंदाबाद , आला रे आला रावण आला ,अश्या घोषणा उत्स्फूर्तपणे देत होते.भाई चंद्रशेखर आझाद यांची सभा बघून म्हातारे कोतारे वयोवृद्ध मंडळी बोलू लागली की अशी चौकसभा आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात पाहिली नाही.कोणता धांगडधिंगा नाही की वारेमाप प्रसिद्धीची होर्डिंगबाजी नाही ,की पुरेसा अवधीही मिळालेला नसताना सुद्धा इतकी प्रचंड चौकसभा होणे ही केवळ भाई चंद्रशेखर यांच्या अफाट लोकप्रियतेची महान साक्ष असल्याचेच सप्रमाण सिद्ध होते. भाई चंद्रशेखर हे आझाद समाज पक्षाच्या संदर्भातील मुंबईतील काही महत्वाची कामे आटोपून रात्री ९ च्या विमानाने दिल्लीला रवाना होणार होते.चेंबूरची सभा रद्द केलेलीच होती.परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देत भाईंनी अति व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून येण्याचे भाईंनी २ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता सानपाड्याच्या मुख्य रस्त्यावर आपली गाडी थांबवून भिमपँथर मा.राजेश गवळी यांना सांगितले की "मै आज शाम 6 बजे आपके यहा आ रहा हुं , आप चेंबूर मे जाकर तैय्यारी किजिये!" असे सांगून जाहीर केले.त्यामुळे पूर्वप्रसिद्धीला थोडा ही वेळ न मिळता अवघ्या ६ तासात ही रेकॉर्डब्रेक सभा आयोजित करून दाखविल्याबद्दल भाई चंद्रशेखर आझाद यांनी भिमपँथर मा.राजेश गवळी यांचा खूप आदराने उल्लेख करताना स्थानिक तरुण नेतृत्व असणारे मा.संतोष गायकवाड यांचाही गौरव केला.ह्या सभेचीच चर्चा मुंबईतील नाक्यानाक्यांवर होताना दिसून येत आहे.
रिपोर्टर