वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे मुलुंडमध्ये सावित्रीबाई फुले जयंती सोहळा संपन्न

मुलुंड: (शेखर भोसले) मुलुंड येथील वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि ३ जानेवारी रोजी करण्यात आले होते. मुलुंड कॉलनी येथे झालेल्या या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकपात्री नाटकाचे सादरीकरण करण्यात आले व या प्रयोगाद्वारे त्यांचा जीवनपट, त्यांचे विचार, त्यांनी केलेली सामाजिक कार्ये, इत्यादी लोकांसमोर आणून त्याला उजाळा देण्यात आले. तसेच अनिसच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. त्याद्वारे अंधश्रद्धा व त्याचे दुष्परिणाम याचे मार्गदर्शन करण्यात आले आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सर्वांनी प्रयत्न करून या लढ्याला साथ देण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त आदरांजली वाहून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्षा सीमा तांबे, मुंबई महासचिव शूभलक्ष्मी सावंत, मुंबई उपाध्यक्षा निशीगंधा कदम, आय टी प्रमूख स्नेहल सोहनी, ईशान्य जिल्हा अध्यक्षा सुनीता गायकवाड, सचिव स्नेहा, वनिता कांबळे तसेच जिल्हा कमिटी तसेच अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन समाजाच्या मुलुंड तालुका महिला अध्यक्षा अर्चना श्रीधर मिसळे व मुलुंड तालुका अध्यक्ष राहुल भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना खाली झालेल्या या कार्यक्रमासाठी विपुल हिरे, रमेश, दिनेश, सचिन चंद्रमोरे तसेच मुलुंड तालुका कमिटी  वार्ड क्र १०८ चे अध्यक्ष अनिल शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन महिला आघाडीचे पदाधिकारीव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट