भांडूप परिसरात मनसेचे रक्तदान शिबिर

मुलुंड: (शेखर भोसले)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापणाच्या माध्यमातून शनिवार दि २ डिसेंबर रोजी महा रक्तदान शिबिर भांडूप स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आला होता. एस विभागाचे प्रभाग संघटक 
संतोष दगडू पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला १०७ रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला. मनसे नेते शिरीष सावंत यांनी या रक्तदान शिबिरास प्रमुख उपस्थिती लावली.

कार्यक्रमाला उपस्थित राहून मनोबल वाढवल्याबद्दल आयोजक संतोष पार्टे यांनी उपस्थितांचे आभार मानले असून हे रक्तदान शिबीराचे योग्य प्रकारे आयोजन व्हावे ह्यासाठी सातत्याने गेल्या महिन्या भरापासून दिवस रात्र सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले आहेत.



संबंधित पोस्ट