संजीवनी खामनकर यांना कवीरत्न पुरस्काराने सन्मानित
- by Reporter
- Jan 03, 2021
- 1172 views
गोंडपीपरी(प्रतिनिधी) चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील संजिवनी खामनकर यांच्या सामाजिक साहित्यिक कार्याची दखल घेऊन बेटी फाउंडेशन वणी (जि. यवतमाळ) यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कविरत्न पुरस्काराने संजीवनी खामनकर यांचा सन्मान करण्यात आला
कोविड परिस्थितीमुळे सामाजिक भान राखून या वर्षी बेटी फाउंडेशन वणीच्या वतीने पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला.
दरम्यान निवडलेल्या मान्यवरांना पुरस्कार त्यांच्या पत्यावर थेट पाठविण्यात आले पुरस्कार निवडीबद्दल संजीवनी खामनकर यांनी आंतरराष्ट्रीय कविरत्न पुरस्कार त्यांच्या आई शारदा खेमाजी खामनकर व वडील खेमाजी खामनकर यांना समर्पित केला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आई-वडील भाऊ नातेवाईक व मित्र मैत्रिणींनी अभिनंदन करून स्वागत केले.

रिपोर्टर