
मुंबईत आझाद मैदान ते मंत्रालय येथे आऱोग्य कंत्राटी कर्मचार्यांना कायम करा,या मागणीसाठी निदर्शने.
- by Reporter
- Jan 02, 2021
- 1078 views
मुंबई(भारत कवितके) सोमवार दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई आझाद मैदानात ' कंत्राटी,हंगामी,व रोजंदारी कर्मचारी हक्क संघ ' तर्फे आझाद मैदान ते मंत्रालय निदर्शने करण्यात येतील असे संघाचे मुख्य संयोजक संतोष चत्रभुज भांडे यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर केंद्र व राज्य सरकारच्या तसेच संलग्नीत विविध आरोग्य संस्थांच्या माध्यमातून कोरोना या महाभयंकर साथ रोगाशी मुकाबला करण्याकरीता विविध पदावरील लढा देणार्याकंत्राटी,व रोजंदारी आधिकारी,व कर्मचारी यांना कोरोना यौध्दे म्हणून कायम कर्तव्यावर ठेऊन,नागरिकांचे जीवितांचे रक्षण करणारी आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याचा आग्रही मागणी यास्तव आझाद मैदान ते मंत्रालय पर्यंत कोविड कंत्राटी कर्मचार्याचा मोर्चा,सत्याग्रह ,आंदोलने करण्यात येणार आहेत.या वेळी डाँ.कष्णा फड,विद्याधर काटे सोलापूर,अमोलकुमार गवई,गंगा शिंगणे बुलढाणा,रूपाली भालेराव पुणे,रूपेश कांबळे उस्मानाबाद,सौदागर शिंदे इंदापूर,विद्या केंगार माळशिरस,श्रीमती सय्यद औरंगाबाद,अंजली तायडे पुणे जाहीरभाई शेख बुलढाणा,राजेश कांबळे मोहोळ आदि संघाचे पदाधिकारी,उपस्थित राहणार आहेत.
रिपोर्टर