कुर्ला येथील कसाईवाडा परिसरात घराची छज्जा कोसळल्याने त्यात एका तीन वर्षीय बालकासह आई जखमी!

मुंबई, दि ३०(जीवन तांबे) कुर्ला येथील कसाईवाडा परिसरात आज अचानक दुपारी एका घराची छज्जा कोसळल्याने त्यात एका तीन वर्षीय बालकासह त्याची आई  जखमी झाली आहे.त्यांना उपाराकरिता राजावाडी रुग्णालयात दाखक केले आहे.

 कासाईवाडा परिसरातील रफिक इस्टेट परिसरात तीन ते चार मजल्याची अनेक अनधिकृत घरे आहे .  त्यातील एका घराची बाल्कनी आज दुपारी अचानक कोसळली त्यात महिला शबनम शेख - वय 32,  आणि तिचा मुलगा अमर शेख - वय 3, हे जखमी झाले आहेत. या दोघांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील महिलेची प्रकृती स्थिर असून मुलाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट