आंबेडकरी समाजाचा बंडखोर नायक भाई चंद्रशेखर आझाद रावण यांचे उद्या मुंबईत आगमन.

मुंबई जंगी स्वागताला सज्ज , भिमपँथर मा.राजेश गवळी यांची माहिती

मुंबई :भारतीय समाजाला अन्याय अत्याचारा विरोधात संघर्ष करण्याचे बळ देणारा , वंचित-शोषित-पीडित-सर्वहारा समाजाच्या न्याय हक्कांना वेशीवर टांगणारा , माय भगिनींच्या अब्रूरक्षणासाठी छातीचा कोट करणारा , करोडो भारतीयांच्या असंतोषाचा जनक , गांजलेल्या-पिचलेल्या समूहाचा बुलंद आवाज व  इथल्या प्रस्थापित जुलमी व्यवस्थेला जबरदस्त टक्कर देऊन गदगदा हलविणारा आंबेडकरी समाजाचा बंडखोर नायक , भीम आर्मी संस्थापक आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक क्रांतीनायक भाई चंद्रशेखर आझाद यांचे ३१ डिसेंबर रोजी  सकाळीच ६.४५ वाजता मुंबईत आगमन होणार आहे. ह्यावेळी मुंबईतील हजारो कार्यकर्ते बाईक रॅली काढून आणि। ढोल ताश्यांच्या गजरात भाईंचे भव्य स्वागत करतील अशी माहिती भीम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

भाई चंद्रशेखर आझाद यांचे सांताक्रूझ विमानतळावर स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रभारी मा.दत्तूभाई मेढे , केंद्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे , कोअर कमिटी प्रमुख राजुभाई झनके , कोअर सदस्य संजयजी बोपेगावकर , माजी राज्यप्रमुख नेहाताई शिंदे , माजी मुख्य महासचिव मनिषभाऊ साठे , माजी महासचिव मा.सुनीलभाऊ गायकवाड , अविनाशजी गायकवाड , आयोजन समितीच्या कोषाध्यक्षा मंगलाताई गायकवाड , माजी प्रवक्ते मा.रमाकांतजी तायडे , माजी उपाध्यक्ष मा.रणधीरजी आल्हाट , कैलासजी जैस्वार , राहुलजी मीनाक्षी वाघ , माजी मुख्य संघटक दिपकजी भालेराव , मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.दिपकजी हनवते , मुंबईचे मुख्य महासचिव मा.प्रितेशजी चितळे यांच्यासह राज्यातील व मुंबईतील सर्वच जिल्हाप्रमुख , तालुकाप्रमुख आणि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते कोरोना संदर्भातील सरकारी सर्व नियम पाळून मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले आहे.

भाई चंद्रशेखर आझाद मुंबईत आल्याबरोबर सकाळी ११.०० वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या राजगृहावर जाऊन भेट देतील त्यानंतर सातरस्त्यावरील राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करून वरळी येथील बिडीडी चाळ आणि आंबेडकर भवन येथे कार्यकर्त्यांना भेटतील अशी माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

त्यानंतर भाई चंद्रशेखर रावण हे दुपारी ३.३० वाजता चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतील व त्याच ठिकाणी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करतील अशी माहिती देताना भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले की दुपारी ४.०० वाजता भाई माहीम दर्ग्यावर जाऊन चादर चढवतील ,त्यानंतर लगेच जय अंबिका नगर , सुंदर बाग , फिनिक्स मॉल , कमानी येथून महाराष्ट्र भीम आर्मीचे माजी राज्यप्रमुख अशोकभाऊ कांबळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराला भाई भेट देतील.त्यानंतर ते चेंबूर मधील पंचशील नगर येथील उपोषणकर्त्यांना भेट देऊन पी.एल.लोखंडे मार्गावरील म.फुले नगर क्र.१ येथे जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि तिथूनच ते त्यांच्या हॉटेलकडे रवाना होऊन मुंबईभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतील अशी माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट