पोर्ट ट्रस्ट युनियनच्या वतीने २०२१ च्या दिनदर्शिका प्रकाशन

मुंबईसालाबादप्रमाणे यावर्षीही मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  २९ डिसेंबर २०२० रोजी सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या बोर्ड रूममध्ये विख्यात नेत्र विशारद तज्ञ व पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते झाले, त्याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, युनियनचे पदाधिकारी सर्वश्री विजय रणदिवे, दत्ता खेसे, विकास नलावडे, निसार युनूस, संदीप कदम, बाळकृष्ण लोहोटे, पुंडलीक तारी, मारुती विश्वासराव उपस्थित होते.

संबंधित पोस्ट