ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचा शिरकाव;३७ उमेदवार,१३ कर्मचारी बाधित

अमरावती: महाराष्ट्रात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्यात. यासाठी जिल्ह्यातून ३हजार ५४७ अर्ज दाखल झालेत. उमेदवारांना आपलं नामांकन दाखल करतांना कोरोना चाचणी केल्याचा अहवाल सादर करण्याच अनिवार्य करण्यात आलंय. उमेदवारांची कोरोना चाचणी करताना जिल्ह्यात ३७ उमेदवार कोरोना बाधित आढळलेत. सोबतच १३ निवडणूक कर्मचारी सुद्धा बाधित असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मेळघाट मधील एकट्या धारणी तालुक्यात तब्बल २२ उमेदवार बाधित आढळले तर तिवसा येथे ८, आणि अमरावती मध्ये ७ असे एकूण ३७ उमेदवार बाधित आढळलेत. त्यामळे बाधित उमेदवारांना १७ दिवसाच विलगिकरण करण्यात आले आहे.कोरोना बाधित उमेदवाराच्या प्रचारार्थ उमेदवाराने निवडलेल्या व्यक्तीची नेमणूक करून प्रचार करण्यास जिल्हा निवडणूक विभागाने परवानगी दिली आहे.

कोरोना काळात निवडणुका होत असल्याने योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते आहे. येत्या १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. या पाश्र्वभूमीवर निवडणूक विभाग सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट