काँग्रेसचा नारा माझी मुंबई,माझी काँग्रेस मुंबईत काँग्रेस स्वबळावरच लढणार
- by Adarsh Maharashtra
- Dec 29, 2020
- 754 views
मुंबई, २९ डिसेंबर :काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सोमवारी पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा तिंरगा झेंडा फडकावण्याचा निर्धार भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी बोलून दाखवला. मुंबईत स्वबळावर लढण्याची इच्छा सर्व कार्यकर्त्यांची असून, विरोधकांसाठी जिथे आवश्यक आहे, तिथे एक घाव दोन तुकडे करून जोरदार झटका दिला जाईल. भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेतील ८२ जागा वाचवून दाखवाव्यात, असे आव्हान यावेळी आमदार भाई जगताप यांनी दिले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा जगताप यांनी स्वबळाचा सूर आळवला.
माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ, अशी प्रतिक्रिया मुंबई कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकासआघाडीचे सदस्य आहोत. महाविकासआघाडी कॉमन मिनिमम प्रोगामवर चालते आहे.त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकासआघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे २२७ जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्या दिवशी सांगितला होता. काल पदभार स्विकारला तेव्हा पुनउल्लेख केला,” असेही ते म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम