ताजला सूट आणि मुंबईकरांकडून मात्र मालमत्ता कर वसूल करणार, ही दुट्टपी भूमिका : रवी राजा
ताज हॉटेलचे ८.५० कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला यावर विरोधक आक्रमक झालेत.
- by Reporter
- Dec 29, 2020
- 1357 views
मुंबई: ताज हॉटेलचे ८.५० कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. हॉटेल ताजनं समोरचा रस्ता आणि फुटपाथ दोन्हीवर सुरक्षेच्या कारणास्तव अतिक्रमण केले आहे. या विषयावर लोकायुक्ताकडे याबाबत तक्रार केली गेली. लोकायुक्त दिलेल्या निर्णय नंतर पालिकेने रस्त्याबाबत कुठलीही धोरण तयार केले नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ताज हॉटेलला झुकते माप दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलाय. तर, समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी सत्ताधारी मोठ्या लोकांचे एजंट म्हणून काम करतात, असा आरोप केला
मुंबई महापालिकेने ताज हॉटेल समोरील रस्त्यावर अडथळे उभारल्याप्रकरणी ८.५० कोटी माफ करण्याचा निर्णय घेतलाय. तर, फुटपाथच्या १.५०कोटी पैकी ५० % रक्कम भरण्याचे प्रस्तावित केले आहे. यावर काँग्रेसनं टीका केलीय. कोरोना काळात पालिकेने आत्तापर्यंत १३०० कोटी खर्च केले आहेत. त्यापेक्षा जास्त ४०० कोटींचा खर्च झालाय अजून ४५९ कोटी रुपये मार्चपर्यंत खर्च होणार असल्याचं सांगितलं जातंय, असं रवी राजा म्हणाले. २५० कोटी रुपये फक्त कोविड सेंट वर खर्च झाले आहे. ते कंत्राट कुणाला आणि कसे दिले गेले आहेत हे सर्वांना माहिती आहे, असंही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेत अजून महाविकास आघाडी झाली नाही. त्यामुळे आम्ही सत्ताधाऱ्यांना लोकांचे प्रश्न विचारणार, असंही राजा यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकामध्ये भाजप आपल्या फायद्या साठी काय करता येईल हे बघत आहे. राज्य सरकारमध्ये भाजपला रोखण्यासाठी सोबत गेलो पण पालिकेत आम्ही लोकांचं प्रश्न मांडत राहू, असंही रवी राजां सांगितले.
समाजवादी पक्षही आक्रमक
मुंबई महापालिकेच्या कारभारावर काँग्रेस पाठोपाठ समाजवादी पार्टीदेखील आक्रमक झाली आहे. महापालिकेतील सत्ताधारी हे मोठ्या लोकांचे एजंट म्हणून काम करत आहेत, असा आरोप सपाच्या रईस शेख यांनी केला. मुंबईकरांना सुधारित मालमत्ता कर पावती दिली जाणार असल्याची घोषणा शिवसेनेनं केली घोषणा होती. मात्र, आता सेना सर्व मालमत्ता कर माफ नाही असं म्हणत आहे. आता ताजला सवलत देण्याचा विचार सेना आणि महापालिका प्रशासन करत आहे, असं रईस शेख म्हणाले. मुंबईतील कोविड सेंटर हे व्यवसाय झाला आहे. आता रुग्ण नाहीत पण सर्व ठेकेदारांना पैसे दिले जात आहेत. या सर्व गोष्टींना विरोध असून याची चौकशी झाली पाहिजे, असं रईस शेख म्हणाले.
रिपोर्टर