मुंबईचं महापौरपद सोपी गोष्ट नाही, भाजपचा हल्ला

मुंबई - २९ डिसेबर : काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं. आधी आपल्याकडे लोक आहेत का, कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत का, काही मतदार शिल्लक राहिले आहेत का? याचा विचार करावा”, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला

आगामी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी यबाबत माहिती दिली आहे. मात्र, काँग्रेसच्या याच निर्णयावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. त्यांनी आज यावेळी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस नेते म्हणतात, श्रेष्टींनी ठरवलं तर आम्ही महापौर बसवू, क्रॉफर्ड मार्केटमध्ये एखादा आयटम विकत घ्यावा, असं काही निवडणुकीतील पद आहे का? इतक्या सहजपणे मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकता येत नाही”, असं आशिष शेलार म्हणाले काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं. आधी आपल्याकडे लोक आहेत का, कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत का, काही मतदार शिल्लक राहिले आहेत का? याचा विचार करावा. बरं हे आम्ही म्हणत नाही तर तुमच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ती शिवसेना म्हणत आहे. तुमच्यासोबत मतदार राहिले नाही. तुमचे नेते राहुल गांधी आता बिनकामाचे झाले ही शिवसेनाच म्हणते, असा टोला शेलारांनी लगावला.

महापौराच्या गप्पा मारणे खूप मोठी गोष्ट आहे. महापालिकेत आज विरोधीनेतेपद शिवसेनेच्या जीवावर मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं, असा चिमटा त्यांनी काढला

ही महाविकास आघाडी नैसर्गिक आलायन्स नाही. त्यांच्या भांडणात आम्हला रस नाही. पण त्यांच्या भांडणामुळे विकासाला खीळ बसतेय. हे सरकार आपआपसातल्या विसंवादामुळे पडेल. पण तोपर्यंत लोकांचं नुकसान खूप होईल, याची आम्हला चिंता आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

यावेळी शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत. त्यामुळे त्यांचं विधान आता जनताही गांभीर्याने घेत नाही. तीन काय, तीस काय वाटेल ते आकडे बोलतायत. त्यांनी काय स्पाय लावून ठेवले आहेत काय? शिवसेना जर अशा पद्धतीने स्पाईनिग करत असेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का? हाच खरा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.

मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत आणि महाविकास आघाडीचे सदस्य आहोत. महाविकास आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर चालते. महापालिका आणि महाआघाडीचा काहीच संबंध नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत २२७ जागांवर लढण्याचा आमचा विचार आहे, अशी भूमिका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडली आहे.

संबंधित पोस्ट