सायन हॉस्पितलातील सुरक्षा रक्षकांचा सन्मान

मुलुंड: (शेखर भोसले) कोरोना काळात शासनाने आखून दिलेल्या नियमांचे, मार्गदर्शक तत्वांचे पालन करत तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना देखील ह्या नियमांचे पालन करायला लावून व अत्यंत शिस्तबद्ध वातावरण ठेवून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी

अहोरात्र सेवा करणाऱ्या लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन येथील सुरक्षा रक्षकांना उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने चिटणीस रामचंद्र लिंबारे यांच्या उपस्थितीत कोरोना योध्दा सन्मान पत्र देऊन शाखाप्रमुख गजानन पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला. यासमयी चंद्रकांत कदम, मोहन शिंदे, सोनेराव माळी, दिपिका लोहार, आबासाहेब काळे व इतर सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट