प्रयत्न फाऊंडेशनतर्फे कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान
- by Reporter
- Dec 27, 2020
- 1192 views
मुलुंड:(शेखर भोसले)केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये प्रयत्न फाऊंडेशन यांच्या वतीने कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा करणाऱ्या व आपले कर्तव्य निभावनार्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. मुलुंड वाहतुक पोलिस चौकी व मुलुंड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी, महानगर पालिका सफाई कामगार, दुर्बल घटकातील कुटुंंब तसेच आशा स्वयंसेविकांना यावेळी कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.
वाटप करण्यात आले तसेच पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
शुक्रवार दि २५ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न
फाऊंडेशनचे संस्थापक अमित रणखांबे, अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आकाश साबळे, राजेश कलेटी, विश्वनाथ साबळे, प्रशांत धेडे, निलेश जानराव, अजिंक्य झेंडे, कुद्ंन थोरात, नितीन लोहकरे, राहुल यादव, मयुर सावंत, रवी माळी, सुशांत वाघमारे, सिधेश लोखंडे, पंकज काटे, राजु थोरात, उमेश घोसाले, अदित मन्डळ व इतर सभासदांनी मेहनत घेतली

रिपोर्टर