भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर
- by Adarsh Maharashtra
- Dec 27, 2020
- 1256 views
मुंबई : राज्यस्तरीय "आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच" समूहाच्या प्रमुख व मुख्य प्रशासिका वृषाली सुरेश खाड्ये (मुंबई) यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून "भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धा" आयोजित केली होती. महाराष्ट्रातील सर्व भाषिक माध्यमांतील इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाठ्यपुस्तकातील संविधान उद्देशिका वाचन करतानाचा व्हिडिओ गुगल फाॅर्मद्वारे स्पर्धक विद्यार्थ्यांनी आयोजकांना पाठविले. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या माध्यमांतील बहुसंख्य विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. व्हिडिओंच्या परीक्षणानंतर "साहित्यमंच" या यू ट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आले.
शुक्रवार दि.२५/१२/२०२० रोजी व्ह्यूज व लाईक्स यावरून निकाल घोषित करून रोख रक्कम व ई-प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरवण्यात आले. या स्पर्धेचे "सकाळ माध्यम प्रायोजक" होते.
ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश चर्हाटे (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभागातील वीणा सोनावणे (प्रशासकीय अधिकारी शाळा), संगीता डोईफोडे (विभाग निरीक्षिका), मीरा सुरेश डहाळे (मुख्याध्यापिका), मंदा नारायण लोहारे (मुख्याध्यापिका) तसेच मिलिंद काशिनाथ पगारे (निवृत्त मेकॅनिकल मेंटेनन्स इंजिनिअर, रिलायन्स इंडस्ट्रीज लि. जामनगर, गुजरात) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
प्रकाश चर्हाटे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धेत विजयी व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून 'आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच' या समूहाशी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून मी जोडलो गेलो असल्याचे सांगितले. तसेच लाॅकडाऊनचा काळात 'आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच' समूहाने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम व सुप्त कलागुणांना वाव देणार्या अभिनव स्पर्धा, याबरोबरच तंत्रज्ञान कार्यशाळा, विषयनिहाय बुद्धीवर्धक सामान्यज्ञान चाचण्यांचे आयोजन, समूहाचे उल्लेखनीय कार्य नियोजन व शिस्तबद्धता इ. बाबींचा उल्लेख करून समूहाचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे गौरवोद्गार काढले. आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच (महाराष्ट्र राज्य) या समूहामार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात याचे कौतुक करून संविधान दिनानिमित्त इ. ५ वी ते १० सर्व भाषिक विद्यार्थ्यांसाठी भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना एक नविन दालन उघडून दिल्याबद्दल वीणा सोनावणे यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. संविधान उद्देशिका वाचन असल्याने अनेक विद्यार्थी या स्पर्धेत अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. समूहाने त्या सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करून स्पर्धकांना एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे असे मत संगीता डोईफोडे यांनी मांडले. मीरा सुरेश डहाळे यांनी अनेक स्पर्धक समूहाच्या पुढील उपक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात हे जाणवले असल्याचे मत मांडले. आम्ही तंत्रस्नेही शिक्षक समूहाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी व समूहाच्या पुढील उपक्रमास मंदा लोहारे यांनी शुभेच्छा दिल्या. मिलिंद काशिनाथ पगारे यांनी प्लास्टीक प्रदूषण, कचरा व्यवस्थापन इ. सामाजिक बाबीवर प्रबोधन करत असतांना या समूहाशी जोडलो गेल्याची भावना आपल्या मनोगतात व्यक्त केली.
अंजू यशवंत पालवे (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई), विराजित उत्तम कुंदे (सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे) आश्लेशा सुनील पूर्वा पाटील ए.बी. गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. समृद्धी विजय चव्हाण, ऋतुजा रवींद्र फर्डे, शिवानी समीर पटवर्धन, प्रांजल निलेश गायकवाड, देवयानी राजेंद्र चव्हाण, श्रुती सुरेश बधे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
प्रकाश चर्हाटे यांच्या सौजन्याने बक्षीसाची रक्कम देय झाली असून विजयी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. संदीप सोनार (जळगाव) यांनी तयार केलेल्या आकर्षक ई-प्रमाणपत्राने सर्व विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
ऑनलाईन कार्यक्रमात ऋतुजा रवींद्र फर्डे (स्वातंत्र्यसैनिक किसन बाबा विद्या मंदिर, धसई, शहापूर), समृद्धी विजय चव्हाण (श.जा.ति.म.जी. परिषद हायस्कूल व ज्यू. कॉलेज, गोरेगाव, गोंदिया) सिद्धांत मनोज साळगाकर (सरस्वती सेकंडरी हायस्कूल, ठाणे) दर्पण अशोक भिरमोडे, (पराग विद्यालय, भांडूप) वेदिका प्रशांत वर्मा (आर. एस. टी. माध्यमिक विद्यालय, भांडूप) आयेशा रणजित घुगरवाल (धनाजी नाना विद्यालय, डोंबिवली) मिताली काणेकर (पराग विद्यालय, भांडूप) अनुजा यशवंत पाल्ये (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई), सिद्धी रविंद्र निचिते (स्वातंत्र्यसैनिक किसन बाबा विद्या मंदिर, धसई, शहापूर) अथर्व विजय गवस (पराग विद्यालय,भांडूप) यांनी मनोगत व्यक्त केले.
वृषाली खाड्ये यांनी अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. उपस्थितांचे स्वागत स्वरूप सावंत (मुंबई), गजानन पुंडे (बुलढाणा), सुनिता अनभुले (मुंबई), सुनील द्रविड (कोल्हापूर), प्रास्ताविक दिलीप यशवंत जाने (जळगाव), आभारप्रदर्शन अंजली ठाकुर (यवतमाळ), सूत्रसंचालन साईली राणे (मुंबई) यांनी केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नरेंद्र कांबळे (परभणी), राजेश चायंदे (अमरावती), सुनीलकुमार बडगुजर (जळगाव), वर्षा चोपदार (मुंबई), राहुल मुंढे (ठाणे) यांचेही सहकार्य लाभले.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम